तपशील
ऐका
भात
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
10 May
Follow

कमी पाण्यात भातशेती करण्याची अनोखी पद्धत (A unique method of rice cultivation with less water)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

भारताच्या शेतीमध्ये खरीप पिकात भातशेतीचे अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु भात शेतीसाठी सर्वात जास्त पाण्याची आवश्यकता असते. म्हणूनच अनेक राज्यातील शेतकऱ्यासाठी आता भातशेती अवघड बनली आहे. भाताचे पीक म्हणजे मुसळधार पाऊस आणि पाण्याने भरलेली भातखाचरे असेच चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते. परंतु काही भागात अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना भात लावणीची कामे ही वेळेत करता येत नाहीत, त्यामुळे भात रोपवाटिका खराब होते. पाण्याच्या अंदाधुंद वापरामुळे आज भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. हे पाहता अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना आता भात लागवडीऐवजी कमी पाण्याची पिके पेरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हे खरे आहे की, पृथ्वीवरील पाणी कमी होत आहे, ज्याचे मूळ कारण म्हणजे दरवर्षी पाऊस कमी होत आहे.  त्याचबरोबर आपली पाण्याची नासाडी करण्याची प्रवृत्तीदेखील याला जबाबदार आहे. तथापि, आता कमीत - कमी पाण्यावर किंबहुना खाचरे पाण्याने भरून न ठेवता, इतर पिकांप्रमाणेच पाण्याच्या पाळ्या देऊन भातपीक घेणे शक्य झाले आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या भाताच्या काही जाती विकसित झाल्या असून, या पद्धतीने भातशेती करण्यात असलेल्या काही अडचणी दूर केल्यास ही पद्धती भूगर्भातील पाण्याची पातळी घटत असलेल्या ठिकाणीही उपयुक्त ठरेल.

भात लागवडीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते, परंतु जर काही गोष्टींची काळजी घेतली गेली तर कमी पाण्यातही भात लागवड करणे सोपे आहे.  त्यासाठी आज आपण भात लागवड करण्याच्या एरॉबिक पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत तसेच, या पद्धतीने पाण्याची बचत कशी होते आणि चांगले उत्पादन कसे मिळेल याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

भात शेतीची एरोबिक पद्धत म्हणजे काय?

  • भात लागवडीच्या एरोबिक पद्धतीत शेतात पाणी भरण्याची किंवा रोपांच्या लागवडीची गरज भासत नाही.
  • या पद्धतीने पेरणीसाठी बियाणे सलग पेरली जातात.
  • या पद्धतीने पेरणीसाठी शेताची तयारी देखील करावी लागत नाही आणि लागवड ही करावी लागत नाही.
  • या पद्धतीमध्ये इतर पद्धतींच्या तुलनेत 40 ते 50 टक्के पाणी वाचवले जाते.
  • कारण दुसर्‍या पद्धतीत प्रथम रोपवाटिकेत अधिक पाणी वापरले जाते, त्यानंतर जेव्हा रोपवाटिका तयार होते तेव्हा व रोप लागवड करताना देखील पाणी द्यावे लागते, मात्र या पद्धतीत या सर्व क्रियांना कमी पाण्याचा वापर केला जातो.
  • हे भात वायू तंत्र भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि फिलीपिन्सस्थित आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (आयआरआरआय) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे, जे कमी पाण्यात पिकवता येते.
  • कटक येथील केंद्रीय भात संशोधन संस्था (सीआरआरआय) चा देखील या प्रकल्पात सहभाग आहे.

कशी करावी एरोबिक पद्धतीने भात शेती?

  • भातशेतीच्या एरोबिक पद्धतीत, गहू किंवा मक्या सारखीच भाताची पेरणी केली जाते.
  • यामध्ये सहसा भाताची (तांदळाची) थेट पेरणी केली जाते.
  • सर्वप्रथम, 2 किंवा 3 वेळा नांगरणी करून नंतर शेत समतल करून माती भुसभूशीत केली जाते.
  • त्यानंतर शेतात जर हलकी आर्द्रता असली, तर या पद्धतीत सीडड्रिल - फर्टीड्रिलच्या माध्यमातून 2-3 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी केली जाते.
  • जर काळी माती असेल तर पेरणी 1-2 सें.मी. खोली पर्यंत केली जाते.
  • एका बी पासून दुसर्‍या बी चे अंतर 22 ते 25 सें.मी. ठेवले जाते.

भाताच्या "बी" चे प्रमाण व बिजोपचार :

  • मे महिन्यात पेरणी केल्यास एकरी 12 किलो बियाणे वापरावे आणि जर जून - जुलैमध्ये पेरणी केली तर बीज 10 किलोपेक्षा कमी वापरावे.
  • जास्तीचे बियाणे पेरल्यामुळे झाडे कमकुवत होतात.
  • पेरणीपूर्वी बिजोपचार केला पाहिजे.
  • प्रथम बियाण्यावर बुरशीनाशकाचा उपचार करावा आणि नंतर सेंद्रिय पद्धतीने उपचार करावा, उपचारित बियाणे त्वरित पेरणीसाठी वापरावे.

एरोबिक पद्धतीने शेती करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी:

कृषी शास्त्रज्ञांच्या मते, एरोबिक पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

  1. या पद्धतीने पेरणी करण्यासाठी दुष्काळ सहन करतील अशा वाणांची / जातींची निवड करावी.
  2. उन्हाळी गव्हाच्या कापणीच्या हंगामानंतर लगेचच नांगरणी करून घ्यावी व भात पेरणी करावी. तसेच पाऊस कसा पडतो याविषयीची माहिती घेऊनच पेरणी करावी.
  3. जर सलग 15 दिवस पाऊस पडला नाही तर पिकाला पाणी भरून द्यावे, जसे आपण गव्हाला पाणी देतो त्याच प्रकारे पाणी द्यावे.
  4. पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी आपण ज्या प्रकारे गव्हाच्या शेतात बंधारे बनवितो आणि त्यास छोट्या - छोट्या भागामध्ये विभागतो, त्याचप्रमाणे भात शेतातही लहान बंधारे बनवून वेगवेगळ्या भागात विभागुन द्यावेत. यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी शेतातच राहते.

५. भाताबरोबर अनावश्यक वनस्पती वाढतात, त्यांना तण म्हणतात. ते नष्ट करण्यासाठी, तणनाशकाची फवारणी करताना हे लक्षात घ्यावे की शेतात पुरेसा ओलावा आहे.

  1. तण नियंत्रणासाठी पेंडीमेथालिन 30% ईसीची (देहात - पेंडिक्स) 200 लिटर पाण्यासाठी 1.25 लिटर प्रति एकर या प्रमाणात व पेरणीनंतर ताबडतोब किंवा 1 - 20 दिवसानंतर फवारणी करावी. बेस्पीरीबॅक सोडियम 10% एस.सी. (ईफको -  युगाटा) 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
  2. जर तुम्ही भाता बरोबर उडीद किंवा मूग पेरले तर तण वाढत नाही.
  3. या पद्धतीने पेरणीसाठी नेहमी सुधारित वाणांची निवड करा. जर उंचीवर एखादे शेत असेल तर लवकर पिकणाऱ्या वाणांची निवड करावी, आणि शेत जर खोलगट भागात असेल व शेतात पावसाचे पाणी गोळा होत असेल तर तेथे मध्यम प्रकारच्या वाणाची निवड करावी.
  4. भात पेरताना सीडड्रिल किंवा झीरो टीलेज मशीनद्वारे पेरणीचा प्रयत्न केला पाहिजे कारण ते एका ओळीत पेरले जाते, ज्यामुळे तण काढणे सोप्पे होते.
  5. जसे आपण गव्हाला गरजेनुसार पाणी देतो त्याच पद्धतीने आपण भातलाही पाणी देणे चालू ठेवले पाहिजे, जर स्प्रिंकलरची उपलब्धता असेल तर पाणी स्प्रिंकलरद्वारे द्यावे जेणेकरून जास्त उत्पादन मिळेल.
  6. एरोबिक पद्धतीने भात पिकाची शेती केल्यास 115 ते 120 दिवसांत पीक काढणीला येते.

अशा प्रकारे एरोबिक पद्धत वापरून भात शेती केल्यास कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळविता येऊ शकते? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भात शेतीची एरोबिक पद्धत म्हणजे काय?

भात लागवडीच्या एरोबिक पद्धतीत शेतात पाणी भरण्याची किंवा रोपांच्या लागवडीची गरज भासत नाही. या पद्धतीने पेरणीसाठी बियाणे सलग पेरली जातात.

2. एरोबिक पद्धतीने भात लागवड केल्यास किती पाण्याची बचत होते?

एरोबिक पद्धतीने भात लागवड केल्यास 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होते.

3. एरोबिक पद्धतीने भात पिकाची शेती केल्यास किती दिवसांत पीक काढणीला येते?

एरोबिक पद्धतीने भात पिकाची शेती केल्यास 115 ते 120 दिवसांत पीक काढणीला येते.

Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor