अंतिम टप्प्यातही हापूसला प्रतिडझन ४५० रुपये दर
जिल्ह्यात हापूस हंगाम अंतिम टप्प्यात असून स्थानिक बाजारपेठेतील आवक कमी झाली आहे. त्यामुळे सध्या हापूसला प्रतिडझन ४५० रुपये दर मिळत आहे. जिल्ह्यात या वर्षी हापूस आंब्याचे दर चांगले राहिले. मार्चपासून स्थानिक बाजारपेठेमध्ये हापूस दाखल झाला. त्या वेळी प्रतिडझन ८०० ते १२०० रुपयांपर्यंत दर होता. मार्चमध्ये अपेक्षित आंबा उत्पादन आले नाही. परंतु एप्रिलपासून आंब्यांची आवक वाढली. परंतु त्याच वेळी विविध शहरांमध्ये मागणी वाढली. स्थानिक बाजारपेठेमध्ये पर्यटकांचा ओढा वाढू लागला. त्यामुळे दर कायम स्थिर राहिले. मे महिन्यात आंब्यांच्या दरात किरकोळ बदल झाले. किनारपट्टी भाग वगळून इतर भागांतील आंबा देखील बाजारपेठेत आल्यामुळे हापूसच्या दरात किरकोळ घसरण झाली. परंतु तरीही बाजारपेठेत प्रतिडझन ५०० ते १००० रुपये दर राहिला. आता आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor