आंबा पिकातील मोहोर व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे.
आंबा ह्या पिकाखालील क्षेत्र व त्यापासून मिळणारे उत्पादन यांचा विचार केला तर, भारताचा जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो. जगात 110 पेक्षा जास्त देशांमध्ये आंब्याचे उत्पादन घेण्यात येते. भारतामध्ये अतिथंडीचा, अतिउष्णतेचा, वाळवंटी प्रदेश सोडल्यास ह्या पिकाची सर्वत्र लागवड दिसून येते. आंब्याचे अधिक उत्पादन घेणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा या राज्यांचा क्रमांक लागतो.
विविध क्षेत्रांमध्ये तापमानानुसार आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते. क्वचित प्रसंगी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी मोहोर येतो. आजच्या लेखात आपण आंब्याच्या मोहोराच्या वेळी बागेचे कसे व्यवस्थापन करावे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
असे करा आंब्याच्या मोहोराचे संरक्षण:
- आंब्याच्या पिकात डेल्टामेथ्रीन 2.8 % ईसी (बायर-डेसिस) 9 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी मोहोर येण्यापूर्वी पोपटी रंगाच्या पालवीवर करावी. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटींवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण मिळते.
- बोंगे फुटताना लॅम्बडा साहेलोथ्रीन 5% ईसी (श्रीराम-लॅम्बडा) 6 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी. या स्थितीत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने हेक्झाकोनॅझोल 5% एससी (ईफको-किनकी) 20 मिली किंवा पाण्यात विरघळणारे 80%, गंधक 20 ग्रॅम तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम 12% + मॅन्कोझेब 63% (देहात- साबू) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
- दुसरी फवारणी झाल्यावर 15 दिवसांच्या अंतराने इमिडाक्लोप्रीड 17.8% एसएल (IFFCO-इसोगाशी) 3 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून तिसरी फवारणी करावी.
- तिसऱ्या फवारणी नंतर पुन्हा 15 दिवसांच्या अंतराने थायोमेथॉक्झेम 25 डब्ल्यूजी (देहात - असेर) 5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणीद्वारे वापरावे.
- पुन्हा चौथ्या फवारणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने डायमिथोएट 30 ईसी (टाटा-टाफगोर) १० मिली किंवा लॅम्बडा सायहेलोथ्रीन 5% 6 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणीद्वारे वापरावे. टीप: तसेच तिसन्या चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस किटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल 5% एससी (ईफको-किनकी) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे 80% गंधक, 20 ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी देखील कार्बेन्डॅझीम 12% + मॅन्कोझेब 63% (ईफको-कागुया) 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
- सहावी व शेवटची फवारणी पाचव्या फवारणीनंतर गरज असल्यास 15 दिवसांच्या अंतराने करावी. पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या किटकनाशकांपैकी न वापरलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी अथवा तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास करावी.
याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
आंबा पिकाच्या फळधारणा अवस्थेत करावयाच्या पीक नियोजनाविषयीची माहिती https://dehaat-kisan.app.link/Y0NDe0DW6Cb येथून वाचा.
वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home
त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
