ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
आले पिकास गाडीला ११ ते १२ हजार रुपये दर

आले पिकाच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र मार्च महिन्यांच्या सुरुवातीपासून दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. सध्या आले पिकास प्रति गाडी (५०० किलो) ११ ते १२ हजार रुपये दर मिळू लागला आहे. गाडी मागे एक ते दोन हजार रुपयांनी दरात सुधारणा झाली असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा निर्माण होऊ लागली आहे. नवीन लागवडीसाठी बियाणे खरेदीचे सौदे सुरू झाले असून दरातील अस्थिरतेमुळे या हंगामात क्षेत्रात घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
36 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
