तपशील
आवक वाढल्यास सोलापूर मार्केटमध्ये दोन दिवस कांदा लिलाव राहणार बंद
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक असते. मागील महिनाभरापासून दररोज 500 पेक्षा अधिक ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. सोमवारी ही 800 ट्रक कांद्याची आवक होती. त्यामुळे लिलावानंतर यार्डातील माल बाहेर काढण्यासाठी मंगळवारी विलंब झाला. त्यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून ऑइल मिल परिसरात लावलेल्या कांद्याचा लिलाव झाला. त्यानंतर दुसरा टप्प्यात कांदा बाजारातील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब झाला. आवक वाढल्याने दरात आणखी घसरण झाली आहे. 800 ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. दुपारी लिलाव संपल्याने गाड्या भरून पाठविण्यासाठी विलंब लागणार आहे. त्यामुळे बुधवारी लिलाव बंद करण्यात आलेला आहे, तर गुरुवारी वेळा अमावास्यानिमित्त लिलाव होणार नाही. आता दोन दिवस कांदा मार्केट बंद राहणार असल्याने शुक्रवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor