अमूल पाठोपाठ मदर डेअरीने केली दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशातील नागरीकांच्या पदरात महागाईच पडताना दिसत आहे. सोमवारी (ता.३) अमूलने आपल्या सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात वाढ केली होती. त्यापाठोपाठ आता मदर डेअरीने देखील दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ सोमवारीच (ता.३) लागू करण्यात आली असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागलेली आहे. सोमवारी (ता.३) अमूलने पिशवीबंद दुधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर वाढ केली होती. यामुळे इतर दूध संघ दुधाच्या दरात वाढ करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यादरम्यान सोमवरीच मदर डेअरीने एक लिटर आणि अर्धा लिटरच्या पिशवीबंद दुधाच्या किंमतीत वाढ केली. त्यामुळे ग्राहकांना आता एका लिटर मागे २ रूपये आणि अर्धा लिटरसाठी १ रूपये अधिक मोजावे लागणार आहेत.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor