तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
4 July
Follow

जनावरांचे वजन मापन आवश्यक (Animal weight measurement is Important)


नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले स्वागत आहे!

बऱ्याच जनावरांची विशेषतः शेळी मेंढीसारख्या मांसल प्राण्यांची बाजार किंमत ही त्यांच्या वजनावरूनच ठरते. गर्भधारणा व योग्य प्रजननासाठी जनावरांचे वजन विशिष्टचं असणे आवश्यक असते. तसेच जनावरांच्या दैनंदिन व्यवस्थापनात देखील त्यांच्या शरीर वजनाच्या मापनाचे विशेष महत्त्व असते. जनावरांना लागणारा चारा आणि पाणी यांची गरज ही त्यांच्या शारीरिक वजनावर अवलंबून असते. तसेच बऱ्याच जनावरांची विशेषतः मांसल प्राण्यांची (शेळी, मेंढी इ.) बाजार किंमत ही त्यांच्या वजनावरूनच ठरते. अशा अनेक कारणांमुळे जनावरांचे वेळोवेळी वजन करणे व त्याची नोंद ठेवणे आवश्यक असते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण जनावरांचे वजन मापन का आवश्यक आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

वजन मोजणे का महत्त्वाचे आहे?

  • जनावरांसाठी आवश्यक दैनंदिन चारा आणि पाणी यांचे प्रमाण ठरविण्यासाठी त्यांचे वजन जाणून घेणे महत्वाचे असते.
  • मांसल जनावरांचा (शेळी, मेंढी इ.) बाजारभाव ठरविण्यासाठी त्यांचे वजन जाणून घेणे गरजेचे असते.

जनावरांचे पैदासक्षम तसेच गर्भधारणा व प्रजनन योग्य वय:

  • जनावरांना तारुण्यावस्थेत पदार्पण करण्यासाठी आपल्या एकूण प्रौढ जनावराच्या वजनाच्या 45-50 टक्के वजन ग्रहण करणे आवश्यक असते.
  • प्रजननक्षम होण्यासाठी त्याचे वजन एकूण प्रौढ वजनाच्या 55 टक्के असणे आवश्यक असते.
  • प्रथम वेतावेळी जनावराचे वजन प्रौढ जनावराच्या वजनाच्या तुलनेत 82 टक्के असावे.
  • दुसऱ्या वेताच्या वेळी जनावराचे वजन प्रौढ जनावराच्या वजनाच्या तुलनेत 82 टक्के असावे.
  • तिसऱ्या वेतापर्यंत जनावरांनी त्यांच्या प्रौढ वजनाच्या 100 टक्के वजन ग्रहण केलेले असते.

वजन मापनामुळे काय होते?

  • वजन मापनामुळे जनावरांच्या आरोग्यासंबंधी तसेच उत्पादन क्षमतेसंबंधी अंदाज बांधण्यास मदत होते.
  • जनावरांच्या प्रजनन क्षमतेविषयी अंदाज बांधता येतो.
  • आजारादरम्यान जनावरांना द्यावयाच्या औषध मात्रेसाठी वजनाचा उपयोग होतो.
  • सहसा ग्रामीण भागात पशुपालकाकडे जनावरांचे वजन मोजता येईल असा भव्य वजन काटा उपलब्ध नसतो. त्यामुळे जनावराचे वजन जाणून घेणे शक्य होत नाही.

जनावरांचे वजन मोजण्याची पद्धत:

प्रथम मोजण्याच्या टेपने शरीराची लांबी (इंच) व छातीचा घेर (इंच) मोजून घ्यावा. या संख्या खालील सूत्रांमध्ये टाकून वजन मोजावे. येणारे उत्तर (जनावरांचे वजन) हे पौंडामध्ये येईल.

1 पौंड म्हणजेच 0.45 किलो

1) अग्रवाल यांचे सूत्र:

  • हे देशी गायीचे वजन मोजण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • वजन = शरीराची लांबी × छातीचा घेर/Y
  • Yची किंमत छातीच्या घेरानुसार बदलते.
  • छातीचा घेर 65 इंचापेक्षा कमी असल्यास Y=9
  • छातीचा घेर 65 ते 80 इंच दरम्यान असल्यास Y=8.5
  • छातीचा घेर 80 इंचापेक्षा जास्त असल्यास Y=8

2) शेफर्स यांचे सूत्र:

  • शेफर्स यांचे सूत्र हे संकरित व विदेशी गायीचेया वजन मोजण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • वजन = शरीराची लांबी × (2 × छातीचा घेर) / 300.

जनावरांच्या वजनाच्या नोंदी ठेवण्याचे फायदे?

  • वजनाच्या नोंदी ठेवल्यामुळे जनावराच्या वयानुसार त्यांची योग्य वाढ होतेय की नाही याकडे लक्ष देता येते.
  • कमी वाढ असेल तर वेळीच नियोजन करून वजन वाढविता येते.

जनावरांच्या वजनाच्या नोंदी पुढीलप्रमाणे ठेवता येऊ शकतात:

  • करडे जन्मल्यानंतर त्यांच्या कानात तासाभरात ओळख क्रमांकाचा बिल्ला मारावा.
  • या क्रमांकामुळे करडांच्या जन्मापासूनच्या नोंदी ठेवणे शक्य होते.
  • बिल्ला उजव्या किंवा डाव्या कोणत्याही कानात मारावा.
  • करडाच्या कानात बिल्ला मारताना कानातील रक्तवाहिन्या (शिरा) टोचल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • कान टोचलेल्या जागी आयोडिन लावावे.
  • जनावरे तीन महिन्यांची होईपर्यंत दर पंधरा दिवसांनी व त्यानंतर दर महिन्याला जनावरांची वजने करावी घ्यावीत. वजनांची नोंद खालीलप्रमाणे ठेवावी.

  • जनावरांचे मासिक वजन
  • बिल्ला क्र.
  • जन्मतारीख
  • नर/मादी
  • जन्मप्रकार एकटे/जुळे
  • जन्मतः वजन (किलो)
  • त्यांनतर जितक्या वेळा वजन केले जाईल तितक्यावेळा
  • वजनाची तारीख (किलो) असे लिहून वजन घेतलेल्या दिवसाची तारीख आणि त्या वेळेस आलेले वजन लिहावे.

तुम्ही तुमच्या जनावरांच्या वजनाची नोंद कशी ठेवता? या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जनावरांचे वय ओळखण्याच्या पद्धती?

1) जनावरांचे निरीक्षण केले तर लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे अशा वयोगटात त्यांचे विभाजन करता येते.

2) लहान जनावरे या गटात वासरांचा, तरुण जनावरांमध्ये आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी जनावरे येतील.

3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली होय.

2. जनावरांच्या वजनाच्या नोंदी ठेवण्याचे फायदे?

जनावरांच्या वजनाच्या नोंदी ठेवल्यामुळे जनावराच्या वयानुसार त्यांची योग्य वाढ होतेय की नाही याकडे लक्ष देता येते. कमी वाढ असेल तर वेळीच नियोजन करून वजन वाढविता येते.

3. जनावरांचे वजन मापन का आवश्यक आहे?

जनावरांसाठी आवश्यक दैनंदिन चारा आणि पाणी यांचे प्रमाण ठरविण्यासाठी त्यांचे वजन जाणून घेणे महत्वाचे असते.

49 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor