तपशील
ऐका
कृषी
कृषी ज्ञान
हिंग
कृषी ज्ञान
DeHaat Channel
12 July
Follow

हिंग लागवड (Asafoetida farming)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

प्राचीन काळापासून भारतातील खाद्यपदार्थांमध्ये हिंगाला विशेष महत्व आहे. खाद्यपदार्थ आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठीही हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, भारतात हिंगाचे उत्पादन खूपच कमी आहे किंवा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही की भारतात हिंग उत्पादित केला जात नाही. त्यामुळे इतर देशांतून हिंगाची आयात करावी लागते. अफगाणिस्तानामधून भारतात हिंग आयात केले जाते. मात्र मित्रांनो आता भारतात हिंग शेती करता येणे शक्य बनले आहे. चला तर मग जाणून घेऊया हिंग लागवडीविषयीची माहिती.

भारतात हिंग लागवड कुठे केली जाते? (Where is Asafoetida/Hing cultivated in India?)

  • हिंगाचा वापर पाहता आता भारतातही त्याच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.
  • जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर हिंग लागवडीशी जोडले गेले आहेत.
  • जर हिंगाची लागवड मैदानी प्रदेशात करता येणे शक्य झाले तर निश्चितच भारतातील बहुसंख्य शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
  • सध्या हिंगाची लागवड थंड प्रदेशात केली जात आहे. मात्र भविष्यात मैदानी प्रदेशात देखील याची शेती करता येणे शक्य होणार असल्याचे जाणकार लोक सांगत आहेत.
  • भारतात हिंग शेती संदर्भात भारतीय संशोधकांचे संशोधन देखील सुरू आहे.

हिंग लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Climate for Asafoetida/Hing Cultivation):

  • हिंग लागवडीसाठी थंड ते कोरडे हवामान आवश्यक आहे.
  • 20-30 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या भागात हिंगाची शेती सहज करता येते.

हिंग लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Land for Asafoetida/Hing Cultivation):

  • हिंग लागवडीसाठी डोंगराळ प्रदेश योग्य मानला जातो.
  • तसेच हिंग लागवडीसाठी वालुकामय, चिकणमाती असलेली जमीन उत्तम मानली जाते.
  • ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही अशा ठिकाणी त्याची रोपे लावावीत. पाणी साचल्यास हिंगाच्या झाडाचे मोठे नुकसान होऊ शकते.

हिंगाचं उत्पादन कसं करतात (Asafoetida/Hing Production)?

  • फेरुला फेटिडा झाडांच्या मुळांतील रसापासून हिंग तयार होते.
  • अर्थात, ते मिळवणं इतकं ही सोपं नाही. पण एकदा हा रस मिळाला, की हिंग बनवण्याची प्रक्रिया सुरू होते.
  • काबुली सफेद आणि हिंग लाल हे हिंगाचे दोन प्रकार असल्याचं स्पाईसेस बोर्डाची वेबसाईट सांगते.
  • पांढरा किंवा फिका हिंग पाण्यात विरघळतो. तर काळा किंवा गडद हिंग तेलात विरघळतो.
  • कच्चा हिंग खूप उग्र वासाचा आणि म्हणूनच अनेकांना खाण्यायोग्य वाटत नाही. त्यात डिंक आणि स्टार्च किंवा तांदुळपिठी टाकून हिंगाच्या वड्या केल्या जातात.
  • हिंगात काय घातलं आहे, यावरून त्याच्या किंमतीत फरक पडतो, असं व्यापारी सांगतात.
  • हिंग पावडरच्या रुपातही मिळतो आणि दक्षिण भारतात हिंग भाजून त्याच्या लाह्यांची पावडर मसाल्यात वापरली जाते.

येथून मागवता येणार हिंगाची रोपे (Asafoetida seedlings can be ordered from):

हिंगाच्या लागवडीशी जोडले जाण्यासाठी तुम्ही नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट अँड जेनेटिक डिपार्टमेंटशी संपर्क साधूनही माहिती मिळवू शकता. याशिवाय इथून रोपे मागवून त्याची लागवड सुद्धा सुरू करू शकता.

हिंग लागवडीतून कमाई:

  • हिंग लागवडीमुळे उत्पन्नाच्या बाबतीत शेतकऱ्यांचे नशीब बदलू शकते.
  • बाजारात एक किलो हिंग 35 ते 40 हजार रुपये किलो दराने विकला जातो.
  • सध्या बाजारात हिंगाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हिंगाच्या व्यवसायातून सहजपणे बाजारपेठेत स्वत:ची ओळख निर्माण करू शकतात आणि बंपर नफा कमवू शकतात.

अशा प्रकारे तुम्हाला देखील हिंगाची लागवड करायची असेल तर, तुम्हाला वरील माहिती फायदेशीर ठरू शकते? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. हिंग पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

हिंग पिकासाठी थंड ते कोरडे हवामान उपयुक्‍त आहे.

2. हिंगाचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?

हिंगाचे पिक डोंगराळ प्रदेशात तसेच वालुकामय, चिकणमाती असलेल्या जमिनीत घेता येते.

3. हिंग लागवडीबाबत माहिती कुठून मिळेल?

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट अँड जेनेटिक डिपार्टमेंटशी संपर्क साधून हिंग लागवडीबाबत माहिती मिळू शकते.

53 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor