तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Aug
Follow

बांगलादेशमधील हिंसाचाराचा कांदा निर्यातीला फटका; पंतप्रधान मोदी यांच्याकडे राजू शेट्टींची मागणी

बांगलादेशमधील बदलेल्या राजकीय घडामोडींचा राज्यासह देशातील कांदा निर्यातदार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यासह देशभरातून बांगलादेशला होणारी कांद्याची निर्यात थांबली आहे. भारत-बांगलादेश सीमेवर कांद्याने भरलेले शेकडो ट्रक अडकले आहे. यामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार व्यापारी चिंतेत आले आहेत. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. तर केंद्र सरकारने बांगलादेशमधील सध्याच्या काळजी वाहू सरकारशी बोलून तोडगा काढवा, अशी विनंती करावी अशी मागणी केली आहे.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor