तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

बाजार समित्यांचे सेस उत्पन्न ५० टक्क्यांनी होणार कमी

राज्यातील बाजार समित्यांचा डोलारा बाजार शुल्कावर उभारला आहे. त्याच बाजार शुल्काची आकारणी ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न ५० टक्क्यांनी घटणार असल्याने, समित्यांचे व्यवस्थापन कोलमडणार आहे. तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्या बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांच्या दबावाखाली त्यांच्याच तिजोऱ्या भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप बाजार समित्यांनी केला आहे. या निर्णयामुळे सरकार आणि बाजार समित्यांतील संघर्ष वाढणार आहे.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor