बेबी कॉर्नची लागवड (Baby corn cultivation)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
तांदूळ आणि गहू या पिकांनंतर मका हे भारतातील सर्वात जास्त लागवडीचे पीक म्हणून ओळखले जाते. याच मक्याच्या अपरिपक्व कोंबांना बेबी कॉर्न असे म्हणतात. लागवडीनंतर दोन महिन्यांच्या आतच बेबी कॉर्न तयार होतात. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो. मक्याचा वापर हा जास्तीत जास्त पोल्ट्री उद्योगासाठी म्हणजेच 55 टक्के याच्यापेक्षा जास्त मका पोल्ट्री उद्योगाला लागतो. त्यामुळे विविध प्रकारे शेतकऱ्यांसाठी मक्याची लागवड फायद्याची ठरते. मक्याच्या प्रकारांमध्ये बेबी कॉर्न ची लागवड केली तर शेतकऱ्यांना दुप्पट फायदा मिळून चांगला नफा मिळू शकतो. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण बेबी कॉर्न लागवडीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
बेबी कॉर्न म्हणजे नक्की काय आणि याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना होणारा फायदा?
- शेतकरी मित्रांनो संपूर्ण जगामध्ये बेबीकॉर्न मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कारण बेबीकॉर्नचे पौष्टिक गुणधर्म आणि चव यामुळे बेबीकॉर्नला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
- बेबीकॉर्न भोवती पाने गुंडाळलेली असल्यामुळे आणि त्यामध्ये कीटकनाशकांचा कोणत्याही प्रकारे परिणाम होत नसल्यामुळे त्याची मागणी जास्त आहे.
- बेबीकॉर्न म्हणजे मक्याचा प्रारंभिक टप्पा असतो. ज्याला आपण आपल्या भाषेत अपरिपक्व मक्का असे देखील म्हणू शकतो.
- बेबीकॉर्नचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असून लागवडीनंतर 50 ते 55 दिवसांत बेबीकॉर्न काढणीसाठी तयार होतात.
- यामुळे शेतकरी एका वर्षामध्ये चार वेळा बेबीकॉर्नचे पिक घेऊ शकतात.
- बेबीकॉर्न लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकरी चार ते सहा क्विंटल उत्पादन मिळते. तसेच मका पिकातून बेबी कॉर्न काढल्यानंतर जनावरांसाठी चाऱ्याची देखील उत्तम सोय होऊन पौष्टिक चारा उपलब्ध होतो. या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरांसाठी 80 ते 160 क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो.
बेबीकॉर्नचा कापणी कालावधी:
- बेबीकॉर्नची लागवड संपूर्ण भारतात केली जाते.
- दक्षिण भारताचा विचार केला तर दक्षिण भारतात संपूर्ण वर्षभरात बेबीकॉर्न लावता येते तर उत्तर भारतामध्ये फेब्रुवारी ते नोव्हेंबर या महिन्याच्या दरम्यान बेबीकॉर्नची लागवड करता येते.
बेबीकॉर्न पिकासाठी योग्य जमीन:
- बेबीकॉर्न हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खत मात्रांची आवश्यकता असते.
- लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडावी.
- जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.
- विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते.
बेबीकॉर्न लागवडीसाठी उपयुक्त हवामान:
- बेबीकॉर्न हे पीक उष्ण हवामानाला उत्तम प्रतिसाद देणारे पीक आहे.
- या पिकाची लागवड उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही हंगामांमध्ये करता येते.
- बेबीकॉर्न हे उबदार हंगामातील पीक असून 50 ते 55 दिवसांत काढणीसाठी तयार होते.
- बेबीकॉर्नचे पीक हे 21°C ते 27°C दरम्यान तापमान आणि 600-900 mm वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागात चांगले वाढते.
बेबीकॉर्न लागवड करताना पूर्व मशागत कशी करावी ?
- बेबीकॉर्न शेतीसाठी खरीप हंगामा करिता उन्हाळ्यामध्ये मान्सून पूर्व एक नांगरणी करून वखराच्या तीन ते चार पाळ्या द्याव्यात आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
भरखते:
- वखराच्या शेवटच्या पाळीपूर्वी शेतात हेक्टरी 15 ते 20 गाड्या कंपोस्ट खत टाकावे.
बेबीकॉर्न लागवड कधी करावी?
खरीप हंगाम : 15 जून ते 15 जुलै
रब्बी हंगाम : 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
उन्हाळी हंगामात : 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी
बेबीकॉर्न लागवड करण्यासाठी वाण :
- ऊर्जा बिया - ओरियन
- सिजेंटा G 5417
- सिजेंटा 5414
- फार्मसन स्वीट बेबी F1
- IRIS HYBRID OP
बेबीकॉर्न लागवड करण्यासाठी बियाण्याचे प्रमाण :
- देशी अल्प धान्याच्या वाणांच्या लागवडीसाठी प्रति एकर 6 ते 7 किलो बियाणे लागते.
- संकरित वाणांच्या लागवडीसाठी एकरी 8 ते 9 किलो बियाणे लागते.
- तसेच क्लस्टर वाणांच्या लागवडीसाठी एकरी 7 ते 8 किलो बियाणे लागते.
बीज प्रक्रिया पद्धत :
पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) 2.5 ग्रॅम ने प्रति किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
पाणी व्यवस्थापन :
- पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी (पिक वाढीची अवस्था असताना)
- 40 ते 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना
- 75 ते 95 दिवसानंतर पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी देणे आवश्यक असते.
बेबीकॉर्नमध्ये घ्यावयाची आंतरपिके :
- कडधान्य : उडीद, मूग, चवळी
- तेलबिया : भुईमूग, सोयाबीन
- भाजीपाला : मेथी, कोबी, कोथिंबीर, पालक इत्यादी
- पेर भात + मका
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार बेबीकॉर्नची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या बेबीकॉर्न पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
- बेबी कॉर्नचे पीक किती कालावधीत येते?
बेबी कॉर्नचे पीक लागवडीनंतर 50 ते 55 दिवसांत काढणीसाठी तयार होतात.
- भारतात कोणत्या महिन्यात बेबी कॉर्नचे पीक घेतले जाते?
बेबी कॉर्नचे पीक दक्षिण भारतात संपूर्ण वर्षभर तर उत्तर भारतामध्ये फेब्रुवारी ते नोव्हेंबर या महिन्याच्या दरम्यान घेता येते.
- बेबी कॉर्न वाढीसाठी किती तापमान आवश्यक असते ?
बेबी कॉर्न वाढीसाठी 21°C ते 27°C तापमान आवश्यक असते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor