तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
20 Feb
Follow

ई-कोलाय कोंबड्यांमधील जिवाणूजन्य घातक आजार! (Bacterial disease in chickens!)


नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना विविध घातक आजार होतात. यापैकी ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रामुख्याने पाण्याद्वारे व खाद्याद्वारे प्रसार होतो. या रोगावर अजून प्रभावी लस आलेली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करुनच या रोगावर नियंत्रण मिळवता येत. त्यामुळे या रोगाची लक्षणे ओळखण अत्यंत महत्वाच आहे. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया या घातक आजाराविषयीची सविस्तर माहिती.

ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव केव्हा होतो?

  • ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वर्षभरात केव्हाही होऊ शकतो.
  • विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये रोगाची लागण होण्याची शक्यता अधिक असते.
  • ब्रॉयलर कुक्कुटपालनामध्ये दरवर्षी ई-कोलायच्या प्रादुर्भावामुळे ब्रूडिंग दरम्यान 40 ते 50 टक्के पक्ष्यांची मरतुक होते.
  • या रोगाचा प्रादुर्भाव कोंबड्यांसह इमू, बटेर, बदके इत्यादी पक्ष्यांमध्येही आढळून येतो.

ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास आढळणारी लक्षणे:

  • कोंबड्यांना ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोंबड्यांची भूक मंदावते.
  • कोंबड्यांचे अपेक्षित वजन मिळत नाही.
  • कोंबड्यांची वाढ खुंटते यामुळे मांस किंवा अंडी उत्पादनात देखील घट येते.
  • सुरुवातीला श्वसनासंबंधी देखील लक्षणे दिसून येतात यामुळे रात्रीच्या वेळी श्वासाची घरघर, तोंडाने श्वास घेण ही लक्षणे दिसतात.
  • ही लक्षणे पाहण्यासाठी कोंबड्यांच रात्रीच्या शांतवेळी निरीक्षण कराव.
  • आजारी कोंबड्यांची पिसे विस्कटलेली दिसतात.
  • कोंबड्या शेडमध्ये कोपऱ्यात मलूल होऊन बसतात.
  • कोंबड्यांना पांढरी, पातळ, रक्तमिश्रीत हगवण होते.
  • अचानक मरतुक होते. बऱ्याच वेळा 50 टक्क्यांपर्यंत मरतुक पोहोचते.
  • या आजारावर प्रभवी लस किंवा उपचार नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार करुनच या रोगावर नियंत्रण मिळवता येतं.

प्रतिबंधात्मक उपाय:

  • हवेतील अचानकपणे होणाऱ्या मोठ्या बदलांपासून पक्ष्यांच संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी लहान पिल्लांच ब्रूडिंग व्यवस्थापन काटेकोरपणे करावं.
  • कोंबड्यांची शेड हवेशीर राहील याकडे लक्ष द्यावं.
  • प्रामुख्याने उन्हाळ्यात शेडमधील वातावरण शुष्क किंवा कोरडं असत. अशावेळी शेडमध्ये पंखे लावले जातात. त्यामुळे शेडमधील घाण धुराळा हवेत पसरतो. त्यासाठी शेड कायम स्वच्छ ठेवावी.
  • गुठळीयुक्त खाद्यामधून म्हणजेच पॅलेट फीड मधून या रोगाचा प्रसार कमी प्रमाणामध्ये होतो असे आढळून आले आहे.
  • उंदराच्या विष्ठेमधून रोगकारक जंतूंचा प्रसार जास्त वेगाने होतो. त्यासाठी शेडमध्ये उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
  • उंदराच्या लेंड्या खाद्यामधून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • या रोगाचा प्रसार प्रामुख्याने अंडी उबवणूक केंद्रामधूनच होण्याची शक्यता असते. त्यासाठी चांगल्या अंडी उबवण केंद्रातील पक्ष्यांची निवड करावी.
  • रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिले सात दिवस पिल्लांना प्रतिजैविकांच्या मात्रा द्याव्यात.
  • पाण्याद्वारे रोगप्रसार टाळण्यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण करावं.
  • प्रयोगशाळेत किमान २ वेळा पाण्याची तपासणी करावी.
  • कोंबड्यांना शक्यतो बोअरवेलच पाणी द्यावं. अशा प्रकारच्या उपाययोजना केल्यास कोंबड्यांतील जिवाणू पासून होणारे आजार रोखता येतात.

तुम्ही तुमच्या कोंबड्यांमधील ई-कोलाय आजाराचे व्यवस्थापन कसे करता? हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रसार कशाद्वारे होतो?

ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने पाण्याद्वारे व खाद्याद्वारे होतो.

2. ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाची लागण होण्याची शक्यता केव्हा अधिक असते?

ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाची लागण विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये होण्याची शक्यता अधिक असते.

3. ई-कोलाय या रोगाचा प्रादुर्भाव कोणत्या पक्ष्यांमध्ये आढळून येतो?

ई-कोलाय या रोगाचा प्रादुर्भाव कोंबड्यांसह इमू, बटेर, बदके इत्यादी पक्ष्यांमध्येही आढळून येतो.

29 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor