तपशील
ऐका
कृषी
फलोत्पादन
द्राक्ष
कृषी ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
2 Dec
Follow

द्राक्ष पिकातील मणी व्यवस्थापन (Berry Management in Grape Crop)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

द्राक्ष हे महत्त्वाचे निर्यातक्षम; परंतु अल्पकाळ टिकणारे फळ आहे.  इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे. महाराष्‍ट्रात नाशिक येथे द्राक्षांची लागवड फारच मोठया प्रमाणावर होते त्याचबरोबर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणीही द्राक्षांची लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये द्राक्ष पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र बदलेले हवामान, गारपीट, दाट धुके यांचा परिणाम द्राक्ष पिकाच्या मणी व्यवस्थपणावर होतो म्हणूनच आजच्या या लेखात आपण द्राक्ष बागेतील सर्वात महत्वाच्या अशा मणी व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

घडाच्या वरील भागातील मण्यांविषयी:

  • बऱ्याच वेळा घडाच्या वरील भागातील मणी हे लहान आकाराचे असल्याचे जाणवते. याचे मुख्य कारण म्हणजे हे मणी संजीवकाच्या द्रावणात पूर्णपणे बुडविले जात नाहीत. अशा वेळी घडाचा विस्तार लक्षात घेऊन वरील एक किंवा दोन पाकळ्या काढाव्यात. त्यामुळे घड बुडविणे सुलभ होते.
  • मणी आकार वाढण्यासोबतच एकसारखे आकाराचे मणी मिळतात. त्यानंतर तीन पाकळ्या सोडून एकानंतर एक पाकळी या पद्धतीने विरळणी करावी. अशाप्रकारे साधारणतः दहा ते बारा पाकळ्या ठेवल्यास १०० मणी घडावर ठेवता येतात.

मण्यांची विरळणी:

  • द्राक्षात थिनिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  • सर्वांत जास्त मजूर आणि बराच कालावधी या कामासाठी लागतो. यासाठी सुरुवातीलाच योग्य प्रमाणात घडामध्ये मणी ठेवून विरळणी केल्यास पुढे थिनिंगचा त्रास होत नाही.
  • मण्यांचा आकार वाढण्यास मदत होते.

मणी आकार वाढविणे:

  • मण्यांचा आकार वाढविण्यासाठी अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. त्याला संजीवकांची योग्य जोड दिल्याशिवाय ते शक्य होत नाही.
  • मात्र संजीवकांचे इष्ट परिणाम घडवून आणण्यासाठी वेलीवरील पाने ही क्रियाशील असतील व मुळांचे कार्य योग्य गतीने सुरू असेल, याची काळजी घ्यावी.

मण्यांचा आकार वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर:

  • अनेक वर्षापासून जीएचा वापर विरळणीसाठी होत आहे.
  • 'जीए' च्या वापरामुळे घडाच्या देठाची लांबी वाढते आणि फुलगळ होऊन पुढील विरळणी साधता येते.
  • जीए किंवा कोणत्याही रसायनाच्या वापरामुळे पूर्णपणे विरळणी साध्य होत नसली मजुरीचा खर्च आणि वेळेमध्ये मोठी बचत होते.
  • सुटसुटीत घडाचे वजन साधारणतः 200 ग्रॅम पेक्षा जास्त आणि 750 ग्रॅम पेक्षा कमी असावे.
  • साधारणपणे 400 ग्रॅम वजनाचे घड मिळण्यासाठी मण्यांचे आकारमान योग्य असणे गरजेचे आहे.
  • हे साध्य करण्यासाठी 'जीए' चा वापर करणे आवश्यक आहे.

'जीए'चे द्रावण करण्यासाठी घ्यावयाची दक्षता:

  • संजीवकांचे द्रावण तयार करताना विरघळणारे रसायन वापरले जाते.
  • जीएचे द्रावण तयार करताना अॅसिटोनचा किंवा इथेनॉलचा वापर केला जातो. त्यासाठी अॅसिटोन 50 मिलि प्रति ग्रॅम जीए असे वापरावे असे सांगितले जाते.
  • मात्र 25 ते 30 मिलि अॅसिटोनमध्ये 1 ग्रॅम जीए पूर्णतः विरघळतो. त्यामुळे यापेक्षा जास्त अँसिटोन वापरण्याची गरज नाही.
  • जीए या संजीवकाचे फवारणीसाठी द्रावण तयार करताना प्रथम मूळ द्रावण (स्टॉक सोल्यूशन) करता येते.
  • सर्वप्रथम 1 ग्रॅम जीए अॅसिटोन सॉल्व्हन्टमध्ये विरघळून घ्यावा. त्याचे एकत्रित पाण्यात एक लिटर द्रावण तयार करावे. अशा पद्धतीने तयार झालेले द्रावण 1000 (हजार) पीपीएम तीव्रतेचे होईल. त्यातून पाहिजे त्या पीपीएमचे द्रावण फवारणीसाठी तयार करता येते.

जीएचा वापर:

  • मणीगळ करण्यासाठी 50 टक्के फुले उमलण्याच्या अवस्थेत जीए 40 पीपीएम ही फवारणी करणे योग्य ठरते. मात्र त्या आधी किंवा नंतरच्या अवस्थेमध्ये जीएच्या वापराचे दुष्परिणाम दिसून येतात. उदा. शॉट बेरीज किंवा घड कडक अथवा लहान मोठे मणी होणे इ. विकृती दिसून येतात. वापर करतेवेळी पुढील काळजी घ्यावी.
  • फुलोरा अवस्था असताना थोडा ताण द्यावा.
  • जीएच्या द्रावणाचा सामू आम्लधर्मी (5.5 ते 6.5 पर्यंत) असावा.
  • फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
  • घडाचा कडकपणा टाळण्यासाठी शक्यतो युरिया फॉस्फेटची सलग फवारणी टाळावी.
  • प्रति दीड फुटावर एकच घड असावा. त्यासाठी काड्यांची विरळणी करावी. एकाच आकाराच्या काड्या वेलीवर ठेवाव्यात.
  • फुलोऱ्यानंतर जीए चा वापर विरळणीसाठी करू नये. त्यामुळे शॉट बेरीजचे प्रमाण वाढते.
  • पाण्याचा ताण जास्त असल्यास फवारणी टाळावी.
  • विरळणीसाठी ढगाळ वातावरणात जीएची फवारणी करू नये.
  • कॅनोपी प्रमाणापेक्षा जास्त असल्यास, घड सतत सावलीत राहत असल्यास फवारणी टाळावी.
  • रोग व किडींचा बंदोबस्त केल्यानंतरच जीएची फवारणी करावी.
  • जीए सोबत झिंक सल्फेटचा वापर करू नये.
  • जीएचा रेसिड्यू दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहत नसल्याचे संशोधनामध्ये दिसून आले आहे.
  • अतिरिक्त जीएच्या वापरण्याने घड कडक झाल्यास मृदू होण्यासाठी कॅल्शिअमचा वापर नायट्रेट किंवा क्लोराईड स्वरूपात करावा. अशा पद्धतीने नियोजन केल्यास मजुरांकडून विरळणी करण्याचे काम सुलभरीत्या होऊ शकेल त्यामुळे सुटसुटीत घडनिर्मिती व घडाचे आकारमान वाढण्यास मदत होईल.
  • जीए चा प्रीब्लुम अवस्थेतील वापर विरळणी व आकारमान वाढीसाठी महत्त्वाचा ठरतो.

PGR व्यवस्थापन:

  • मण्यांचे सेटिंग - 20 ppm GA
  • 6mm मण्यांची साईज - 50 ppm GA - Machine - 30 ग्रॅम
  • 8mm मण्यांची साईज - 60ppm GA - Machine - 40 ग्रॅम
  • 10mm मण्यांची साईज - 50ppm GA - Machine - 30 ग्रॅम
  • GA सोबत अजून काय काय देता येऊ शकते?
  • कॅल्शियम (Calcia - Machine - 1 Itr)
  • Seaweed (Agrisia - Algarina) - 500 मिली ते 1 लिटर या प्रमाणात
  • Amino Acid (Coromandel - Fantac Plus) 800 मिली प्रति एकर

तुम्ही तुमच्या द्राक्ष पिकातील मणी व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. द्राक्ष वेलीला लागणारे प्रमुख रोग कोणते?

भुरी, करपा आणि केवडा हे द्राक्ष पिकाला लागणारे प्रमुख रोग आहेत.

2. द्राक्ष पिकाच्या वाढीसाठी योग्य हवामान कोणते?

द्राक्ष पिकाच्या योग्य शाखीय वाढीसाठी उष्ण व कोरडे वातावरण उपयुक्त ठरते.

3. महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष लागवड कुठे होते?

महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष लागवड नाशिक जिल्ह्यात होते.

33 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor