तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Nov
Follow

भातपीक कापणी हंगामाला प्रारंभ

भातपिक हे प्रामुख्याने गरवे, निम गरवे व हळवे अशा स्वरूपात विभागले जात असून ऐन दिवाळीच्या तोंडावर त्याच्या कापणीला प्रारंभ करण्यात आला आहे. वरकस किंवा उखारु जमिनीवरचे हळवे भातकापणीला आले आहेत. मात्र परतीच्या पावसाने भातपीक आडवे होऊन मोठ्या प्रमाणात त्याचे नुकसान झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. मागील काही दिवसात एकूण तीन हजार मिमी इतका पाऊस कोसळल्याने भातकापणीसाठी शेतकरी धजावत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.


49 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor