ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
भराव हटाव... शेती बचाव'चा कागलमधील शेतकऱ्यांचा नारा

कागल तालुक्यातील वेदगंगा-दूधगंगा नदीवरील सर्वच बंधारे आणि पुलांवर महापुराचे पाणी आले. तर काही पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्त्यावर पाणी आले. नदीवर पूल बांधताना दोन्ही बाजूंना टाकलेल्या भरावामुळे तालुक्यात तब्बल २ हजार हेक्टरमधील पिके दहा दिवस पाण्याखाली राहिली. पुलांच्या भरावामुळेच मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली बुडाली. त्यामुळे पुलांच्या बाजूचे भराव काढून त्या ठिकाणी तेवढ्याच उंचीचे पिलर उभारून पाणी जायला मार्ग करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
