दुधी भोपळ्यामध्ये वाढत आहे फळमाशीचा प्रकोप, जाणून घ्या नियंत्रणाच्या पद्धती (Bottle Gourd : Fruit Fly: pest damage and preventive methods)
नमस्कार शेतकरी बंधू/भगिनींनो,
दुधी भोपळा ही वेलवर्गीय भाजी असून, महाराष्ट्रामध्ये या पिकाची सरासरी 566 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. दुधी भोपळ्याची लागवड प्रामुख्याने खरीप व उन्हाळी हंगामात करतात. या पिकास उष्ण व दमट हवामान मानवते. भोपळ्याची लागवड जानेवारीच्या मध्यापासून, खरीपाची मध्य जून ते जुलैपर्यंत आणि रब्बीची लागवड सप्टेंबरच्या शेवटी ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. जैदच्या लवकर पेरणीसाठी भोपळ्याची रोपवाटिका जानेवारीच्या मध्यात केली जाते. योग्य हवामान, जमीन न मिळाल्यास दुधी भोपळ्याच्या पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. किडींमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण दुधी भोपळ्याच्या पिकातील प्रमुख अशा फळमाशी या किडीविषयी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
फळमाशीची (Fruit Fly) ओळख:
- फळमाशी रंगाने पिवळसर तांबूस असते.
- फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशी सारखी दिसते व साधारण पाच ते सहा मी. मी. लांब असते.
- फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब असतात.
फळमाशी जीवनक्रम:
- नर आणि मादी फळमाशीचे मिलन होते व त्यानंतर मादी फुलोऱ्यात आलेल्या पिकामध्ये आढळून येते.
- एकदम कळीतून बाहेर आलेल्या छोट्या अशा फळावर फळमाशीची मादी डंख मारते आणि आतमध्ये अंडी घालते.
- एक दोन दिवसात म्हणजेच अंडी घालण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यामधून अळी बाहेर येते व फळाच्या आतमध्येच वाढ चालू होते.
- जसे जसे फळ मोठे होईल तसतसे आतमध्ये अळी पण मोठी होत जाते आणि फळ आतून खायला सूरवात करते.
- अळी चा कालावधी संपल्यानंतर अळी फळातून बाहेर जमिनीत पडते व कोषावस्थे मध्ये जाते ज्यातून पुन्हा नवीन प्रौढ फळमाशी तयार होते.
फळमाशीची लक्षणे (Symptoms):
- फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते.
- त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात.
- या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात.
- या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात अशी फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.
फळमाशीमुळे होणारे नुकसान:
- फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते.
- त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात. या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात.
- या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात अशी फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.
फळमाशीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन:
- जमिनीची नांगरट करून जमीन चांगली तापू देणे गरजेचे असून त्यामुळे या अळीचे कोश उष्णतेत नष्ट होतात.
- शक्यतो फळमाशीला प्रतिकारक असणाऱ्या जातींची लागवड करावी.
- फळमाशी ग्रस्त बागेत पडलेली फळे गोळा करून ती नष्ट करून टाकावी किंवा लांब नेऊन त्यांचा नायनाट करावा.
- बागेमध्ये कामगंध सापळे एका एकरसाठी 15 ते 20 लावावे.
- फळधारणा जेव्हा होईल तेव्हा पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टरीन (1000 पीपीएम) 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यासोबतच तज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नुकसानीची पूर्वसंकेत पातळी पाहून शिफारशीप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी घेणे गरजेचे आहे.
उपाय (Remedy):
- शेतात कामगंध सापळे एका एकरसाठी 15 ते 20 लावावे.
- फ्लुबेंडियामाइड 90 + डेल्टामेथ्रिन 60 एससी (बायर-फेनोस क्विक)100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- सायंट्रानिलिप्रोल 10.26% डब्ल्यू /डब्ल्यू ओडी (एफएमसी-बेनेविया) 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- फ्लुबेंडिएमाइड 39.35% एम/एम एस.सी (बायर-फेम) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- फ्लुबेंडियामाइड 20% डब्ल्यूजी (टाटा-ताकुमी) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
कीड नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणीच्या वेळी लक्षात ठेवायच्या गोष्टी:
- फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
- फवारणीसाठी वापरण्यात येणारे पाणी हे 6.5 ते 7.5 पीएच चे असावे.
- फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा आहे याची खात्री करून घ्यावी.
- फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
- फवारणी मिश्रणामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नयेत.
तुमच्या पिकात फळमाशीची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. दुधी भोपळ्याची लागवड कधी केली जाते?
दुधी भोपळ्याची लागवड प्रामुख्याने खरीप व उन्हाळी हंगामात करतात. या पिकास उष्ण व दमट हवामान मानवते
2. दुधी भोपळा पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?
दुधी भोपळा पिकावर प्रामुख्याने काळा करपा, नागअळी, फळमाशी, मावा, भुरी रोग, डिंक्या रोग तसेच केवडा रोग यासारख्या प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.
3. दुधी भोपळ्याच्या पिकात कीड नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणी कधी करावी?
कीड नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor