ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Aug
Follow
'बफर स्टॉक'मधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने 'भावस्थिरीकरण निधी योजने' अंतर्गत चालू वर्षी बफर स्टॉकसाठी पाच लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. यापैकी प्रत्येकी २.५ लाख टन खरेदीचे उद्दिष्ट 'नाफेड' व 'एनसीसीएफ' या दोन्ही केंद्रीय संस्थांना देण्यात आले होते. त्यापैकी खरेदी करून साठवून ठेवलेला बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १८) 'नाफेड'च्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक दौरा केला असून या बाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली आहे.
60 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor