म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा लाभदायी! (Buffalo breeding - Winter is beneficial!)
नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे म्हशींच्या आरोग्य व प्रजननास हितावह ठरतो. हिवाळ्याच्या ३ ते ४ महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक म्हशीचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूक असावे. हिवाळा हा म्हशींच्या प्रजननासाठी सर्वांत अनुकूल ऋतू मानला जातो. राज्यातील हवामान, हिवाळ्यातील सौम्य तापमान आणि उष्णतेचा अभाव हे घटक प्रजननासाठी पोषक ठरतात. पशुपालकांनी या ऋतूचा योग्य फायदा घेण्यासाठी ठराविक योजना आखून काम करणे आवश्यक आहे. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा कशाप्रकारे लाभदायी ठरतो याविषयी.
हिवाळा ऋतूचे म्हशींना होणारे फायदे:
- हिवाळ्यात प्रजनन क्रिया योग्य प्रकारे घडल्यास पुढे येणाऱ्या उन्हाळ्यासारख्या कडक व प्रतिकूल ऋतूचा म्हशींना विशेष अपाय होत नाही.
- हिवाळ्यात म्हशी माजावर येऊन गाभण ठरण्याकडे लक्ष दिल्यास म्हशींकडून दूध व वेत मिळण्याची निश्चिती करता येते.
- हिवाळ्यात गाभण म्हशींची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. याउलट हिवाळ्यात प्रजनन बंद असलेल्या म्हशी पुढे उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या अभावामुळे अशक्त होतात. त्यामुळे त्यांना पुढे पावसाळा संपेपर्यंत शरीर, आरोग्य राखणे शक्य होत नाही.
- हिवाळा संपला, तर पुढे वर्षभर म्हैस भाकड राहू शकते.
हिवाळ्यातील पोषक हवामानाचे महत्त्व:
- हिवाळ्यातील कमी उष्णता आणि सौम्य थंड हवामानामुळे म्हशींच्या शरीरातील उष्णता नियमन सुरळीत होते. हे प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण करते.
- हिवाळ्यात उष्णतेमुळे होणारा तणाव टाळला जातो. त्यामुळे म्हशींच्या प्रजनन क्षमतेत वाढ होते.
- हिवाळ्यातील भरपूर चारा व पोषणमूल्ये युक्त आहारामुळे जनावरांची आरोग्यस्थिती सुधारते.
- प्रजननानंतर गाभण म्हशींच्या शरीरात हार्मोन्सची वाढ होते. त्यामुळे अधिक दूध उत्पादन शक्य होते.
हिवाळ्यात प्रजनन यशस्वी कसे करायचे:
- योग्य आहार व्यवस्थापन
- चारा व पौष्टिक आहाराचा पुरवठा नियमित करावा.
- हिवाळ्यात ऊर्जा, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहार द्यावा.
- म्हशींच्या आहारात खनिज मिश्रणाचा समावेश करणे त्यांच्या आरोग्यासाठी आणि प्रजनन क्षमतेसाठी अत्यावश्यक आहे. हिवाळ्यात याचा योग्य वापर केल्यास म्हशींच्या प्रजननावर सकारात्मक परिणाम होतो.
- जनावरांना सुलभ प्रजननासाठी चांगले आरोग्य व सुदृढ प्रकृतिमानाची गरज असते.
- पोषक वातावरण, तसेच हिरवा व वाळलेला चारा मिळत असल्यामुळे म्हशी हिवाळ्यात धष्ट-पुष्ट होतात.
- खरीप पिकांचा चारा, हिरवे गवत, संतुलित आहार यामुळे म्हशीचे शारीरिक वजन वाढते.
म्हशींची आरोग्य तपासणी व घ्यावयाची काळजी:
- म्हशींची नियमितपणे आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
- औषधांचा वापर करून म्हशींच्या शरीरावरील बाह्य आणि अंतर्गत परजीवींपासून त्यांचे संरक्षण करावे.
- हिवाळ्यातील थंडीचा म्हशींना अपाय होत नाही. थंडीमुळे आरोग्यास अपाय होत नसला, तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने म्हशी रात्री व पहाटे गोठ्यात ठेवाव्यात.
- चांगल्या प्रकृतिमानामुळेच म्हशींच्या प्रजननाची क्रिया हिवाळ्यात सुरू राहते. हिवाळ्याच्या तीन-चार महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक म्हशीचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूकता ठेवावी.
माज निरीक्षण:
- म्हैस माजावर येणे ही प्रजननाची पहिली पायरी असल्यामुळे आपल्या म्हशी माजावर येतात का याकडे लक्ष द्यावे.
- हिवाळ्यात म्हशींच्या माज चक्राची व्यवस्थित नोंद ठेवा.
- म्हशींचा माज ओळखण्यासाठी सकाळी म्हशी गोठ्यात उभ्या राहण्यापूर्वी, तर सायंकाळी गोठ्यात परतलेल्या म्हशी बसल्यानंतर बळस, सोट टाकतात काय याचे दैनंदिन प्रत्येक म्हशीचे निरीक्षण करावे.
- माजावर आलेली म्हैस लक्षात आल्यास त्यांचे योग्य वेळी कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक पद्धतीने प्रजनन करून घेणे महत्त्वाचे आहे.
पाणी व निवाऱ्याची सोय:
- हिवाळ्यात पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.
- म्हशींना उबदार निवारा पुरवावा. विशेषतः रात्रीच्या वेळी थंडीपासून संरक्षण करावे.
- धानाचे तनीस, गव्हाच्या भुसा, गवत, किंवा चटई (मॅट) आच्छादन म्हणून वापरावे.
- निवाऱ्यात योग्य खेळती हवा ठेवावी. मात्र थंड वारे थेट जनावरांच्या शरिरावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
हिवाळ्यात म्हशींच्या प्रजननासाठी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हिवाळ्यातील अनुकूल हवामान, पोषणमूल्ययुक्त आहार आणि व्यवस्थित देखभाल यामुळे प्रजनन दर वाढतो. योग्य नियोजन आणि काळजी यामुळे म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा खऱ्या अर्थाने 'सुवर्णकाळ' ठरतो.
तुम्ही तुमच्या म्हशींच्या प्रजननासाठी काय व्यवस्थापन करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. म्हशींच्या प्रजननासाठी सर्वांत अनुकूल ऋतू कोणता?
हिवाळा हा म्हशींच्या प्रजननासाठी सर्वांत अनुकूल ऋतू मानला जातो.
2. म्हशींची आरोग्य तपासणी किती कालावधी ठेवून करणे गरजेचे आहे?
म्हशींची नियमितपणे आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
3. म्हशी माजावर आल्याचे कसे ओळखावे?
म्हशींचा माज ओळखण्यासाठी सकाळी म्हशी गोठ्यात उभ्या राहण्यापूर्वी, तर सायंकाळी गोठ्यात परतलेल्या म्हशी बसल्यानंतर बळस, सोट टाकतात काय याचे दैनंदिन प्रत्येक म्हशीचे निरीक्षण करावे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor