शिमला मिरचीतील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Capsicum : Major diseases and their management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
आपल्या देशात पिकवल्या जाणाऱ्या विविध भाज्यांमध्ये शिमला मिरची या पिकाला प्रमुख स्थान आहे. भारतात मुख्यत: हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमला मिरचीची लागवड केली जाते. शिमला मिरचीची लागवड साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये केली जाते कारण या महिन्यातील हवामान या पिकासाठी पोषक असते. पण शिमला मिरचीची उत्पादकता पातळी खूपच कमी आहे. त्याच्या उत्पादनात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे पिकांवर होणारा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव. या पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण शिमला मिरची पिकातील प्रमुख रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
मर रोग:
मर रोगाचा प्रसार जमिनीतून होतो.
लक्षणे (Symptoms) :
- रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडाची मुळे सडतात. झाड मरते. मोठ्या झाडाचे खोड व तबक सडते.
- फुलोऱ्यापासून पीक तयार होईपर्यंत हवेतील या रोगाच्या बीजाणूमुळे तबकालाही रोगाची बाधा होते.
- तबकावर पांढरी बुरशी वाढून संपूर्ण तबक व्यापते.
नियंत्रणाचे उपाय (Management) :
- पिकांची फेरपालट करावी.
- पिकात उथळ कोळपणी करावी.
- जमिनीतील पाण्याचा चांगला निचरा करावा.
- लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
- हेक्झाकॉनाझोल 5% एससी (धनुका-हेक्झाधन) 400 मिली प्रती पंप 200 मिली प्रति एकर पाण्यातून फवारावे.
- कॉपर ऑक्झीक्लोराईड 50% डब्लूपी (क्रिस्टल - ब्लु कॉपर) 400 ग्रॅम 200 ली पाण्यात मिसळून हे द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळांभोवती टाकावे.
- थियोफेनेट-मिथाइल 70% डब्ल्यू पी (बायोस्टॅड-रोको) - 400 ग्रॅम प्रति एकर किंवा DEM 45 (DeHaat) - 500 ग्रॅम प्रति एकरने ड्रेंचिंग करावी.
भुरी रोग:
लक्षणे (Symptoms):
- रोगाची सुरवात प्रथम जुन्या पानांपासून होते.
- भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या वर व खाली पांढऱ्या रंगाची बुरशी येते.
- प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि वेली वाळतात.
- हा रोग देठ, खोड आणि फळांवरही पसरतो. यामुळे वेलींची वाढ खुंटते.
- रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.
- दमट हवामानात या रोगाचा प्रभाव जास्त होतो.
- भुरी रोग झाल्यास पाने मोठ्या संख्येने गळण्यास सुरुवात होते.
नियंत्रणाचे उपाय (Remedy):
- पाण्यात मिसळणारे गंधक 400 ग्राम 200 मिली पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने पिकांवर दोन फवारण्या कराव्यात.
- हेक्साकोनाज़ोल 5% एससी ( देहात स्लेयमाईट एफएस) 400 मिली किंवा
- हेक्साकोनाज़ोल 5% + कैप्टन 70% ( टाटा- ताकत) 300 ग्राम किंवा
- इप्रोव्हॅलिकार्ब 5.5% + प्रोपिनेब 61.25% w/w डब्ल्यू पी (66.75 WP) (बायर - Melody duo) 1- 1.5 ग्रॅम/लिटर किंवा
- हेक्साकोनाझोल 4% + झिनेब 68% डब्ल्यू पी (Indofil - Avtar) 500 ग्रॅम 200 लिटर किंवा
- मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू पी (Dow - systhane) 16 ग्रॅम/ एकर किंवा
- टेबुकोनाझोल 250 EC (25.9% w/w) (बायर - फॉलिक्युअर) 100 मिली किंवा
- अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एससी (देहात-ॲझिटॉप) - 300 मिली/एकर किंवा
- अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) - 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.
- पुढील फवारणी आवश्यकतेनुसार 8-10 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.
फळे कुजणे आणि फांद्या वाळणे:
लक्षणे (Symptoms):
- या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शिमला मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतो आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात.
- बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात.
नियंत्रणाचे उपाय (Remedy):
- या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे काढून त्यांचा नाश करावा.
- तसेच कॅप्टन 70% + हेक्साकोनाझोल 5% डब्ल्यू पी (टाटा-TAQAT) 400 ग्रॅम 200 लिटर पाणी किंवा
- थायरम 75% डीएस (सीडकॅप) किंवा डायथेन एम-45 75% डब्ल्यूपी (डायथेन एम - 45) किंवा
- कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल - ब्लु कॉपर) यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 400 ग्रॅम 200 मिली पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने तीन-चार वेळा फवारावे.
चुरडामुरडा रोग (बोकड्या):
लक्षणे (Symptoms) :
- प्रथम पानाच्या खालील बाजूवर, मुख्य शिरेवर, देठावर व बारीक शिरेवर अतिशय लहान, अनियमित लांबीचे, गडद हिरव्या रंगाचे लांबट चट्टे दिसतात.
- रोग ग्रस्त पाने लहान राहतात.
- या पानांच्या कडांमधील हरितद्रव्यांचा नाश झालेला आढळून येतो. त्याच्या कडा नागमोडी होऊन पिवळ्या पडतात.
- पाने ठिसूळ होऊन त्वरित सडतात व वाळतात.
- पानांचा देठ वाजवीपेक्षा जास्त लांबीचा राहतो. अशा प्रकारच्या पानांमुळे झाडाची वाढ खुंटते.
- या रोगाचे अखेरच्या अवस्थेतील लक्षण म्हणजे पानांची लांबी व रुंदी कमी होते.
- पाने तलवारीच्या पात्यासारखी दिसतात.
- ती ताठ व सरळ उभी राहतात. अशा पानांचा झुबका शेंड्यावर तयार झालेला दिसतो. म्हणूनच या रोगास बंची टॉप असे म्हणतात.
- यापैकी कोवळ्या पानांमधून सूर्यप्रकाशाकडे पाहिले असता पानांवर गर्द हिरव्या किंवा काळसर रंगाच्या तुटक रेषा स्पष्टपणे दिसतात.
- रोगट झाडातून सहसा घड बाहेर पडत नाही. पडल्यास केळी लहान आकाराची येतात.
उपाय (Remedy):
- फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रीड 40% डब्ल्यूजी (देहात - demfip) @5 ग्रॅम/पंप आणि अॅसेटामिप्रीड 20% एसपी (टाटा - मानिक) @10 ग्रॅम/पंप आलटून पालटून 7 दिवसांच्या अंतराने फवारा किंवा
- एसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.8% एसपी (यूपीएल - लान्सरगोल्ड) 400 ग्रॅम एकरी फवारा.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुमच्या शिमला मिरचीच्या पिकात वरील पैकी कोणते रोग दिसून आले? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. शिमला मिरची पिकात आढळून येणारे रोग कोणते?
शिमला मिरचीच्या पिकात प्रामुख्याने मर रोग, भुरी रोग आणि फळे कुजणे आणि फांद्या वाळणे इ. रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
2. शिमला मिरचीची लागवड कोणत्या हंगामात करता येते?
शिमला मिरचीची लागवड वर्षभर करता येते.
3. मर रोगाचा प्रसार कशामार्फत होतो?
मर रोगाचा प्रसार जमिनीमार्फत होतो.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor