जनावारांच्या दुधातील फॅट कमी होण्याची कारणे (Causes of reduced Fat in Animal milk)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधात किमान फॅट 3.8; तर म्हशीच्या दुधात 6 फॅट असणे आवश्यक असते. त्यापेक्षा फॅट कमी असल्यास ते दूध अप्रमाणित समजले जाते. दुधाची किंमत स्निग्धांश वर ठरवली जाते. पावसाळ्यात भरपुर प्रमाणात कोवळा व हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे दुधाळ जनावरांना खुप जास्त प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये तंतुमय घटक आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे दुधातील फॅट कमी लागते. दुधातील फॅट कमी लागण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.
दुधाची निर्मिती:
- आहारातील घटक पचनसंस्थेत जातात. तिथे त्यांचे पचन होऊन रक्तात शोषले जातात. हे रक्त कासेतून फिरत असताना, कासेतील पेशी रक्तातील आवश्यक घटक वापरून त्यापासून दुधाची निर्मिती करत असतात.
- कास ही पोटाला स्नायूंनी जोडलेली असते. उजवा आणि डावा असे कासेचे दोन भाग पडतात.
- या दोन्ही भागांचे पुन्हा पुढचा उजवा, डावा आणि मागचा उजवा, डावा असे भाग पडतात. पुढच्या दोन्ही भागांचे आकारमान मागच्या दोन्ही भागांपेक्षा लहान असते. त्यामुळे पुढच्या दोन सडातून 40 ते 45 टक्के आणि मागील भागातून 50 ते 60 टक्के दूध मिळते.
दुधातील फॅट चे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी काय कराल?
- जनावरांच्या आहारात एकूण तंतुमय घटकांचे प्रमाण म्हणजेच कडबा किंवा वैरणीचे प्रमाण 28 ते 31 टक्के असणे आवश्यक आहे.
- दुधाळ जनावरांना आहारातून एकूण 65 ते 75 टक्के कडब्याचे प्रमाण मिळाले पाहिजे. जेणेकरुन जनावराच्या रुमेनमधील फायबर मॅट म्हणजे तंतुमय जाळे तयार होण्यास मदत होते. त्यामुळे कोटी पोटातील तंतुमय घटकाचे विघटन होऊन दुधातील फॅटचे सातत्य टिकून राहते.
- दूध उत्पादन क्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळे आनुवंशिकता किंवा जनावराची जात कोणती आहे यावरही दुधातील फॅटचे प्रमाण ठरते.
- वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न घालता, चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा.
- दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त 12 तासांचे अंतर असावे. हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल; पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.
- दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणपणे एक टक्का, तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे कासेतील पूर्ण दूध काढून घेण गरजेचं आहे.
- दुधात केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे फॅटचे प्रमाण कमी होते. दुधात पाण्याची भेसळ केली असता, दुधातील घन घटकांचे प्रमाण कमी होते. तसेच, दुधाची भुकटी मिसळून भेसळ केली असता दूध घट्ट दिसते, पण फॅट कमी लागते.
तुमच्या जनावारांच्या दुधातील फॅट कमी होण्याची काय लक्षणे तुम्हाला दिसून आली? तुम्ही काय उपाययोजना केल्या? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात गाई, म्हशींच्या दुधात किमान किती फॅट असावे?
महाराष्ट्रात गाईच्या दुधात किमान फॅट 3.8; तर म्हशीच्या दुधात 6 फॅट असणे आवश्यक असते.
2. जनावरांच्या दुधाची किंमत कशावर ठरवली जाते?
जनावरांच्या दुधाची किंमत स्निग्धांशा वर ठरवली जाते.
3. कासेचे किती भाग असतात?
कास ही पोटाला स्नायूंनी जोडलेली असून. उजवा आणि डावा असे कासेचे दोन भाग पडतात.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor