तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 June
Follow

चिपळूणमध्ये हापूसला शेकडा १८०० रुपये दर

हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरीही शेवटच्या टप्प्यात फळाच्या आकारानुसार पेटीचा दर दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे. कॅनिंगचा दरही ३० ते ३५ रुपये किलोपर्यंत आहे. हापूसचा दर हंगामात हळूहळू आवाक्यात येऊ लागल्यामुळे सर्वसामान्यांकडून खरेदी सुरू झाली आहे. तर चिपळुणमध्ये हापूसला शेकडा १८०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक उत्पादन हाती लागल्यामुळे बागायतदार समाधानी आहेत. आता जेमतेम आठ दिवस हापूस आंबा हाती राहील, असे बागायतदारांकडून सांगण्यात आले. लहरी हवामान, अवेळी पाऊस, उन्हाची वाढलेली काईली अशा हवामानात यावर्षीचा हापूस हंगाम राहिला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पीक बागायतदारांच्या हाती लागले.


50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor