तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
13 Feb
Follow

म्हशींतील उष्णतेचा ताण वेळीच करा नियंत्रित!


नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

उन्हाळ्यात तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. अशा वेळी बहुतांश पशुपालकांकडे म्हशींसाठी गोठ्याची व्यवस्था नसते. त्यामुळे म्हशींना झाडाखाली किंवा कमी सावलीत तर कधी-कधी उघड्या जागेत ठेवलं जातं. उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा परिणाम म्हशींमध्ये लक्षणीय पद्धतीने जाणवतो. त्यामुळे म्हशींच्या आहारावर, आरोग्यावर तसचं प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम जाणवतो. आजच्या भागात आपण याचविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्यात म्हशींच्या आरोग्यावर होणारा परिणाम:

  • उन्हाळ्यातील वाढत असलेलं तापमान, कोरडी हवा आणि आर्द्रतेचा म्हशीच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो.
  • म्हशीचा रंग काळा आणि त्यांच्यात घाम ग्रंथी कमी असल्यामुळे त्यांना शरीरातील उष्णता उत्सर्जित करताना अडचणी येतात.
  • म्हशी शारीरिक तापमान स्वनियंत्रित करू शकत नाहीत आणि त्यामुळेच, म्हशींना उष्णतेचा त्रास होतो आणि त्यांच्यामध्ये ताण निर्माण होतो.

उन्हाळ्यात रेडींच्या आरोग्यावर होणारा परिणाम:

  • उष्णतेच्या ताणामुळे रेडीचे ऋतुचक्र विस्कळीत होतं आणि त्या उन्हाळ्यात माजावर येत नाहीत.
  • त्यामुळेच, उन्हाळ्यातील काळ व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.
  • उन्हाळ्यात कमी प्रमाणात हिरवा चारा, खाद्य आणि योग्य निवाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे रेडीची शारीरिक वाढ खुंटते-प्रजनन क्रिया काही प्रमाणात विस्कळीत झल्याने भविष्यात मिळणाऱ्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. त्यासाठी सुरवातीपासूनच रेडीचे योग्य व्यवस्थापन असल्यास प्रजनन लवकर कार्यान्वित होते.
  • साधारणपणे पहिले वेत वयाच्या चौथ्या वर्षी होऊ शकते. काही कारणांनी रेडीचे पहिले वेत उशिरा होत असल्यास दैनंदिन व्यवस्थापन खर्चात नाहक वाढ होते.
  • वातावरणातील अति जास्त तापमान आणि आर्द्रता या घटकांचा रेडीच्या शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याने शरीरातील संप्रेरकांच संतुलन बिघडून पहिल्यांदा उशिरा माजावर येतात, काही वेळेस गाभण रेडीचा गर्भपात होतो किंवा व्यायल्यानंतरच्या समस्या उद्भवतात.

म्हशींना व रेड्यांना येणाऱ्या उष्णतेतील ताणावर उपाय करताना:

  • वाढत्या उन्हात त्यांना योग्य प्रमाणात हिरवा चारा, प्रथिने असेलेलं पोषक खाद्य आणि चांगला हवेशीर निवारा उपलब्ध करुन द्यावा. त्यामुळे उष्णतेच्या ताणापासून म्हशींच संरक्षण होऊन त्यांची चांगली वाढ होते.
  • गोठ्यातच म्हशींना पुरेसं स्वच्छ, थंड पाणी आणि खाद्याची व्यवस्था ठेवावी यामुळे त्यांची शरीरक्रिया सुरळीत चालते.
  • म्हशींना सकाळी लवकर बाहेर चरायला सोडावं किंवा दुपारी ४ वाजेनंतर पुन्हा चरायला सोडावं.
  • दुपारी त्यांच्या अंगावर ३ ते ४ वेळा थंड पाणी शिंपडावे.
  • मुक्त संचार गोठा जर असेल तर गोठ्यातील टाकीत कायम पाणी भरून ठेवावं.
  • म्हशी थंड वातावरण असताना वैरण योग्य रीतीने खातात. त्यामुळे या काळात म्हशींना पुरेशी वैरण द्यावी.
  • प्रजननक्षम रेडीची योग्य देखभाल करावी. त्या माजावर येत आहेत का? किंवा मुक्या माजाची लक्षणे दाखवितात का याकडे लक ठेवावं.
  • गाभण रेड्यांना जास्तीची खनिज मिश्रणे आणि जीवनसत्वे नियमीत खाद्यातून द्यावीत.
  • म्हशींमध्ये जर उष्माघाताची लक्षणे दिसून आली तर त्यांना थंड आणि शांत ठिकाणी बांधावं, थंड पाणी पाजावं. शरीरावर थंड पाणी शिंपडावं आणि पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. अशा प्रकारे वाढत्या उन्हात म्हशींची काळजी घेतल्यास म्हशींतील उष्णतेचा ताण कमी करता येतो.

तुम्ही तुमच्या म्हशी व रेड्यांचे उन्हाळ्यात कशाप्रकारे व्यवस्थापन करता? हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जनावरांचे वय ओळखण्याच्या पद्धती?

1) जनावरांचे निरीक्षण केले तर लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे अशा वयोगटात त्यांचे विभाजन करता येते.

2) लहान जनावरे या गटात वासरांचा, तरुण जनावरांमध्ये आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी जनावरे येतील.

3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली होय.

2. उष्णतेच्या ताणाचा म्हशींवर काय परिणाम दिसतो?

उष्णतेच्या ताणाचा म्हशींच्या आहारावर, आरोग्यावर तसचं प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम जाणवतो.

3. म्हशींना उष्णतेचा त्रास का होतो?

म्हशी शारीरिक तापमान स्वनियंत्रित करू शकत नाहीत आणि त्यामुळेच, म्हशींना उष्णतेचा त्रास होतो आणि त्यांच्यामध्ये ताण निर्माण होतो.

35 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor