तपशील
ऐका
कपाशी
कृषी
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
7 June
Follow

कपाशीची सुधारित वाण (Cotton : Best Varieties)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे.

कापसाची पांढरे सोने म्हणूनही सर्वत्र ओळख आहे. कापसाचे उत्पादन 100 पेक्षा अधिक देशांमध्ये घेतले जाते. तथापि, जगातील 75 टक्के उत्पादन चीन, अमेरिका, भारत, पाकिस्तान आणि ब्राझीलमधून घेतले जाते. महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याची सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून ख्याती आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलसंधारणशक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर कापसाची लागवड केली जाते. याच कापसाच्या विविध जाती हंगामानुसार, योग्य जमिनीवर लावल्यास उत्तम उत्पादन मिळविता येते. म्हणूनच आजच्या आपल्या या भागात आपण महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम अशा देहातच्या व इतर कापूस बियाण्यांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. वाणांची योग्य रित्या निवड करून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

देहात DCS-1102 वाणाची (कापसाचे बी | Cotton Seed) वैशिष्ट्ये:

  • बोंडे जास्त व मोठी असतात.
  • बोंडे चांगल्याप्रकारे उघडतात व ती काढणे देखील सोपे जाते.
  • जास्त बोंडे, सर्वाधिक उत्पन्न क्षमता हे या बियाण्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.
  • हे बियाणे पानांचे रोग, जिवाणू ब्लाइट, अँथ्रॅकनोज त्याचबरोबर ग्रे बुरशी, फुलकिडे, तुडतुडे या शोषक कीटकांसाठी देखील सहिष्णु आहे.
  • हे वाण स्वच्छ सफेद कापसासाठी प्रसिद्ध आहे.

देहात प्रभात मॅक्सकॉट (कापसाची जात | Cotton Variety) वाणाची वैशिष्ट्ये:

  • जास्त आणि मोठ्या बोंडांचे उत्पन्न.
  • सिंचनाची आवश्यकता पावसावर अवलंबून असते.
  • शोषक कीटक प्रतिरोधी वाण.
  • उंच पसरणारी वनस्पती
  • बोंडांचे वजन: 5.5 - 6.0 ग्रॅम
  • पेरणीचा हंगाम: मे - जून
  • या वाणाची बोंडे मोठी असतात, चांगल्याप्रकारे उघडतात व ती काढणे देखील सोपे जाते.
  • पीक परिपक्वता अवधी 140 ते 145 दिवसांचा असतो
  • कापसाच्या DCS-1102 व प्रभात मॅक्सकॉट या दोन्ही बियाण्यांच्या पेरणीसाठी एकरी 470 ग्रॅमची 2 पॅकेट्स पुरेशी असतात.

आता जाणून घेऊया कपाशीच्या इतर टॉप वाणांविषयीची (Top Varieties)  माहिती:

तुलसी सीड्स - कबड्डी या वाणाची (कापसाचे बी | Cotton Seed) वैशिष्ट्ये:

  • बोंडांचे वजन: 6 - 7  ग्रॅम
  • 90% पेक्षा अधिक पाच पाकळी बोंडे या वाणाला लागतात
  • रस शोषक कीटक प्रतिरोधी वाण.
  • कीटक आणि रोगांप्रती सहनशील वाण
  • उच्च उत्पन्न (कापसाचे उत्पन्न) देणारे वाण
  • या वाणाच्या पेरणीसाठी एकरी 900 ग्रॅमची 2 पॅकेट्स पुरेशी असतात.

रासी 659 या वाणाची (कापसाची जात | Cotton Variety) वैशिष्ट्ये:

  • बोंडांचे वजन (कापसाचे बोंड) : 6.5 - 7 ग्रॅम
  • लागवडीचे अंतर: 4 बाय 1.5
  • जास्त आणि मोठी बोंडे
  • वजनदार कापूस
  • बोंडे चांगल्याप्रकारे उघडतात व ती काढणे देखील सोपे जाते
  • हे वाण काढणीसाठी लवकर तयार होते
  • या वाणाच्या पेरणीसाठी एकरी 900 ग्रॅमची 2 पॅकेट्स पुरेशी असतात.

US agriseeds - US 7076 वाणाची (कापसाचे बी | Cotton Seed) वैशिष्ट्ये :

  • परिपक्वता (दिवस): 155-160,
  • बोंडांचे वजन: 5.5 - 6 ग्रॅम
  • 155 ते 160 दिवसांत काढणीसाठी तयार होणारे वाण
  • 3 ते 4 फुटावर लागवड करता येते तसेच 3 बाय 2, 3 बाय 1.5 व 4 बाय 2 या प्रकारे देखील लागवड करता येते.
  • भरपूर उत्पादन व भरघोस उत्पन्न देणारे वाण
  • या वाणाच्या पेरणीसाठी एकरी 900 ग्रॅमची 2 पॅकेट्स पुरेशी असतात.

प्रभात Supercot वाणाची वैशिष्ट्ये :

  • मोठी बोंडे
  • बोंडांचे वजन: 5.5 - 6 ग्रॅम
  • बोंडे चांगल्याप्रकारे उघडतात व ती काढणे देखील सोपे जाते
  • रस शोषक कीटक प्रतिरोधी वाण
  • लागवडीचे अंतर 4 बाय 1.5
  • काढणीचा कालावधी : 150 ते 160 दिवस
  • या वाणाच्या पेरणीसाठी एकरी 900 ग्रॅमची 2 पॅकेट्स पुरेशी असतात.

Ajeet ११५ BG वाणाची वैशिष्ट्ये :

  • सर्वात लवकर येणारे वाण
  • बोंडांचे वजन: 5 - 5.5 ग्रॅम
  • काढणीचा कालावधी : 145 ते 160 दिवस
  • पाण्याची कमतरता असणाऱ्या ठिकाणी देखील अधिक उत्पादन देणारे वाण
  • रोगांप्रति चांगली प्रतिकार क्षमता
  • या वाणाच्या पेरणीसाठी एकरी 900 ग्रॅमची 2 पॅकेट्स पुरेशी असतात.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार योग्य वाणाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या शेतात कपाशीच्या कोणत्या वाणाची लागवड करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. कापसाची लागवड कधी करावी?

कापसाची लागवड मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.

2. कापसाची वेचणी कधी करायची?

कापूस पूर्णपणे परीपक्व झाल्यावर म्हणजेच वाणांच्या परीपक्वतेच्या कालावधीनुसार साधारणतः 145 ते 160 दिवसांत कापसाची वेचणी करवी.

3. कापूस लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?

पाण्याचा निचरा होणारी व जलसंधारणशक्ती उत्तम असणारी मध्यम ते भारी जमीन कापूस लागवडीसाठी उत्तम समजली जाते.

40 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor