चाऱ्यासाठी मका पिकाची शेती (Cultivation of maize crop for fodder)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात संश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होते. मका पिकात जास्त उत्पादन क्षमता आढळते. तसेच मका पिकाचा चारा अत्यंत सकस व रुचकर असतो. मका पिकाचा हिरवा चारा दुभत्या जनावरांना खाऊ घातल्याने जनावरांचे दुधाचे प्रमाण वाढते. मका हिरवा चारा व मुरघास म्हणून देखील वापरता येतो. आजच्या या भागात आपण चाऱ्यासाठी मका पिकाची शेती कशी करावी याविषयी जाणून घेणार आहोत.
जमीन (Soil):
- मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खतमात्रांची आवश्यकता असते.
- मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
- काळी कसदार, गाळाची व नदीकाठची जमीन अत्यंत उपयुक्त असते.
- जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.
हवामान (Weather):
- मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे.
- मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही या पिकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 अंश से तापमान चांगले असते.
- परंतु जेथे सौम्य तापमान (20 ते 25 अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो.
- 35 अंश से. पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते.
मशागत:
- पेरणीपूर्वी एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
- लागवडीसाठी सपाट वाफे अथवा सऱ्या सोडाव्यात. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.
लागवड कालावधी (Sowing period):
- खरिपात जून ते ऑगस्ट या कालावधीत, रब्बी हंगामात ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी - मार्चमध्ये मक्याची पेरणी करावी.
- पाभरीने 30 सेंमी अंतरावर पेरणी करावी.
बियाणे प्रमाण व बीजप्रक्रिया (Seeds):
- पेरणीसाठी प्रतिएकरी 30 किलो बियाणे वापरावे.
- पेरणीपूर्व बीजप्रक्रियेसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे.
सुधारित जाती:
आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझीट, विजय, गंगा, सफेद-२, गंगा सफेद-५, डेक्कन डबल हायब्रीड
आंतरमशागत:
- पेरणीपासून महिनाभर पीक तणविरहित ठेवावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार एक-दोन वेळा खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे.
- एक महिन्यानंतर कोळपणी करावी. त्यामुळे तण नियंत्रणही होते.
- तसेच मुळांना हवा मिळून पिकाची वाढही होते.
लागवड पद्धत (Cultivation Method):
- उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी 75 सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून 20 ते 25 सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे चांगले झाकून घ्यावे, तसेच लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत 60 सें.मी. व दोन रोपांत 20 सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी.
- सरी - वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेवून पेरणी करावी.
खत व्यवस्थापन (Fertilizer Management):
- पूर्वमशागत करताना प्रतिएकरी साधारणपणे 1.2 टन (4-5 बैलगाड्या) चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
- प्रतिएकरी नत्र 40 किलो, स्फुरद 20 किलो व पालाश 20 किलो अशी खतमात्रा आवश्यक आहे.
- यापैकी पेरणीवेळी नत्र 20 किलो, स्फुरद 20 किलो व पालाश 20 किलो द्यावे.
- नत्राची उर्वरित मात्रा 20 किलो पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी.
पाणी व्यवस्थापन (Water Management):
रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
मका पिकात आढळून येणाऱ्या किडी (Insects):
- खोड किडा
- मावा
- कणसातील अळी
- गवती नाकतोडे
कापणी (Harvesting):
- हिरव्या व सकस चाऱ्यासाठी मक्याचे पीक 50 टक्के फुलोऱ्यात आल्यावर म्हणजेच पेरणीनंतर अंदाजे 65 ते 70 दिवसांनी कापणी करावी.
- अनेक शेतकरी मका पूर्ण पक्व झाल्यावर जनावरांना खाऊ घालतात. त्याऐवजी 50 टक्के पीक फुलोऱ्यात असताना जनावरांना चारा द्यावा. यावेळी चारा अधिक सकस असतो.
- साधारणतः योग्य व्यवस्थापनात मक्याचे एकरी 220 ते 280 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार मका पिकाची लागवड केल्यास भरपूर चारा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या मका पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. मका हे कोणत्या हंगामातील पीक आहे?
मका हे उबदार हंगामातील पीक आहे.
2. मका पिकाला किमान किती दिवसांचा कालावधी लागतो?
मका पिकाला किमान 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.
3. हिरव्या व सकस चाऱ्यासाठी मका पिकाची कापणी केव्हा करावी?
हिरव्या व सकस चाऱ्यासाठी मक्याचे पीक 50 टक्के फुलोऱ्यात आल्यावर म्हणजेच पेरणीनंतर अंदाजे 65 ते 70 दिवसांनी कापणी करावी.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor