स्टार फळाची शेती (पॅशन फ्रुट) | Cultivation of Star Fruit (Passion Fruit)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
पॅशन फळपीक हे कृष्णकमळ वर्गातील एक वेलवर्गीय पीक आहे. या फळाचे उगमस्थान ब्राझील आहे. भारतात या फळाची लागवड निलगिरी, कोडायकॅनाल, हिमाचल प्रदेश, वाई, पाचगणी, इत्यादी भागात तुरळक प्रमाणात केली जाते. भारतात श्रीलंकेतून कोइम्बतूर भागात पॅशनफुट प्रथम आले. या पिकाची फळे स्टार सारख्या आकाराची असतात म्हणून या फळाला स्टार फळ असे देखील म्हणतात. स्टार फळ आकाराला गोल आणि हलके असते. या फळाचे झाड 30 फूट उंचीपर्यंत आणि 25 फूट रुंदीपर्यंत वाढू शकते. स्टार फळाचा काढणीचा कालावधी मोठा असतो आणि जून महिन्यापासून फळे येण्यास सुरुवात होते. स्टार फळाचे पूर्ण विकसित झाड 100 ते 200 किलो स्टार फळे सातत्याने देऊ शकते. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया स्टार फळाच्या शेती विषयी काही महत्वाच्या गोष्टी.
स्टार फळाच्या शेतीसाठी योग्य हवामान (Weather) :
- स्टार फळाला मध्यम प्रकारचे हवामान मानवते.
- तसेच उष्ण व दमट हवामान देखील या पिकास योग्य समजले जाते.
- कडक थंडी अथवा कडक ऊन या फळ झाडास सहन होत नाही.
स्टार फळाच्या शेतीसाठी योग्य जमीन (Soil) :
- स्टार फळे वाढण्यासाठी पूर्ण सूर्यप्रकाश असलेले ठिकाण सर्वोत्तम आहे.
- मध्यम प्रकारची, निचऱ्याची, किंचित उताराची जमीन या फळ पिकास चांगली मानवते.
स्टार फळ पिकाच्या सुधारित जाती:
पर्पल पॅशनफ्रुट :
- या जातीची फळे गोल व आकाशी रंगाची असतात.
- फुले पांढऱ्या रंगाची असतात.
यलो पॅशनफ्रुट :
- या जातीची फळे मोठी, अधिक रसाची आणि स्वादयुक्त असतात.
- फळांचा रंग पिकल्यावर पिवळा होतो.
स्टार फळ पिकासाठी योग्य हंगाम (Season) :
- स्टार फळाची लागवड जानेवारी - फेब्रुवारी किंवा जून महिन्यात करतात.
बियाण्यांचा प्रसार:
- फळांच्या बिया ओलसर पीट शैवालामध्ये ठेवा.
- एकदा बिया फुटू लागल्या की, रोपे वालुकामय चिकणमाती असलेल्या कंटेनरमध्ये टाका.
- योग्य काळजी स्टार फळ पिकाच्या टिकाऊपणाची हमी देते.
स्टार फळाची अभिवृद्धी:
- सामान्यपणे पॅशनफ्रुट लागवड बियांपासून केली जाते.
- गुटी कलमाने लागवड केल्यास फळे लवकर लागतात.
- लागवड स्वतंत्रपणे, कुंपणावर अथवा इतर आधारावर करतात.
स्टार फळाची गुटी कलमाने लागवड :
- स्टार फळाच्या फांद्यांवर गुटी कलम करणे सोपे असून अशा प्रकारच्या कलमांना लवकर मुळे फुटतात.
- गुटी कलम करण्यासाठी 15 सेंटिमीटर लांबीच्या पक्व काडीवरील पाने, काटे आणि नवीन पानांच्या फुटी काढून टाकून तेथे 3 ते 4 सेंटिमीटर रुंदीची गोलाकार साल काढून टाकावी.
- साल काढलेल्या भागावर ओले शेवाळ गुंडाळून त्यावर पॉलिथीन कागद सुतळीने घट्ट बांधावा. त्यानंतर दीड महिन्यांनी साल काढलेल्या जागी मुळे येतात. नंतर कलम मातृवृक्षापासून वेगळे करून स्वतंत्र जागी लावावे.
स्टार फळाची लागवड:
- स्टार फळाची लागवड आयताकृती करतात.
- स्टार फळासाठी ओळी मधील अंतर हे 10 फूट आणि रोपातील अंतर हे 7 फूट ठेवावे.
- स्टार फळासाठी शेणखत वापरलं जात रासायनिक खाताचा वापर शक्यतो नाही केला जात.
- लागवडी नंतर साधारण दोन ते अडीच महिन्यात वेल स्टेचिंग वर पसरल जात. त्याची बांधणी झाल्यावर जुलै - ऑगस्ट मध्ये फुल येण्यास सुरुवात होते.
- या फळा वर कुठल्या ही रोगाचा, बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही.
- या फळाची किंमत साधारण 70 रुपये ते 140 रुपयांपर्यंत आहे.
स्टार फळ पिक खत व्यवस्थापन :
- स्टार फळाच्या वेलींना कंपोस्ट खत - 5 कि., नीमपेंड 1 कि. इत्यादी खते घालावीत.
- वेलींना खते पावसाळ्यापूर्वी बांगडी पद्धतीने गोलाकार स्वरूपात घालावीत.
- खते दिल्यानंतर वेलींना हलके पाणी द्यावे.
स्टार फळ पिक पाणी व्यवस्थापन :
- स्टार फळाच्या वेलींना पावसाळा वगळून हिवाळ्यात 10 दिवसांनी तर उन्हाळ्यात 5 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी.
- दर वेळी पाणी देताना बेताने द्यावे.
स्टार फळ पिकात घ्यावयाची आंतरपिके:
- लागवडीनंतर सुरुवातीचे काही महिने पालेभाज्या, घेवडा यांसारखी पिके घ्यावीत.
स्टार फळ पिकातील आंतरमशागत व तणनियंत्रण:
- वेळोवेळी आंतरमशागत - खुरपणी, निंदणी करून तणांचा नाश करावा.
छाटणी:
- स्टार फळाच्या वेलींना वळण आणि आधार यांची गरज असते. त्यासाठी सोईनुसार मांडव करावा.
- फुले-फळे येण्यासाठी छाटणीची गरज नसते. तथापि, फळांची काढणी झाल्यावर जून फांद्या छाटल्यास नवीन धुमारे येऊन अधिक फळे लागण्याची संधी मिळते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार स्टार फळाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही स्टार फळाची लागवड करता का? पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात स्टार फळासाठी योग्य हवामान कोणते?
स्टार फळाला मध्यम प्रकारचे हवामान मानवते.
2. स्टार फळासाठी कोणती जमीन योग्य असते?
मध्यम प्रकारची, निचऱ्याची, किंचित उताराची जमीन या फळ पिकास चांगली मानवते.
3. भारतात स्टार फळाची लागवड कोणत्या भागात केली जाते?
भारतात स्टार फळाची लागवड निलगिरी, कोडायकॅनाल, हिमाचल प्रदेश, वाई, पाचगणी, इत्यादी भागात तुरळक प्रमाणात केली जाते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor