तपशील
ऐका
कृषी
कृषी ज्ञान
सीताफळ
बागायती पिके
DeHaat Channel
8 Apr
Follow

सीताफळ बहार व्यवस्थापन (Custard Apple Bahar Management)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हे महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फार प्राचीन काळापासून सिताफळ हे दऱ्या खोऱ्यातील कोरडवाहू फळझाड, रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे. सिताफळाची लागवड प्रामुख्‍याने आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश व बिहार राज्‍यात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्‍हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. दौलताबाद व पुण्‍याची सिताफळे फारच स्‍वादिष्‍ट लागतात असा शेरा बऱ्याच चोखंदळ ग्राहकांकडून मिळतो.  मराठवाडयातील धारुर व बालाघाट ही गावे सिताफळासाठी प्रसिध्‍द आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर, तर सातारा जिल्‍हयात शिरवळ, कवठे, जवेळे, वाल्‍हे आणि खंडाळा फलटण तालुक्‍यातील काही ठराविक भाग सिताफळाकरिता यशस्‍वी म्हणून नावारूपाला येऊ लागला आहे. सन 1990-91 पासून सुरु झालेल्‍या रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्‍पादन विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू फळझाडांच्‍या लागवडीत सिताफळाचा समावेश करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे सिताफळ लागवड ही शेतकरी बांधवांना चालून आलेली एक संधी आहे. महाराष्‍ट्रात सन 1990-91 पासून या योजनेअंतर्गत सिताफळाची यशस्‍वी लागवड 25906 हेक्‍टर क्षेत्रावर करण्‍यात आलेली आहे. आज आपण याच लोकप्रिय अशा सीताफळाच्या बहार व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

बहार धरणे म्हणजे काय (What is Bahar)?

  • बहार धरणे म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आणि तिच्या मगदुरानुसार बागेचे पाणी बंद करून बागेला ताण देणे, बागेची छाटणी व मशागत करून नंतर पाणी व खते देणे.
  • सीताफळाच्या अधिक उत्पादनाकरिता बहाराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
  • सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहार येतो. मात्र, पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीस बहार धरता येतो.
  • उन्हाळी बहाराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने दर चांगला मिळू शकतो.

बहार (Custard Apple Bahar) व्यवस्थापनात पुढील बाबी महत्त्वाच्या असतात:

  • एकाच वेळी फळधारणा होण्यासाठी बहार धरला जातो. बहार घेण्यासाठी प्रथम बागेस पाणी देणे बंद करावे.
  • झाडांची छाटणी करणे मागील हंगामातील फळांची काढणी झाल्यानंतर पाण्याचा ताण व हिवाळ्यातील कमी तापमानामुळे सीताफळ झाडांची पानगळ होते. झाडे सुप्तावस्थेत जातात.
  • अपेक्षित फळधारणा व फळांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने झाडाच्या फांद्यांची हलकी छाटणी करणे आवश्यक असते.
  • उन्हाळी बहार धरावयाचा असल्यास फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात, तर नैसर्गिक बहार धरताना मे महिन्याच्या अखेरीस छाटणी करावी.
  • छाटणीमुळे झाडांची वाढ नियंत्रित ठेवली जाते.
  • झाडावर मर्यादित फळे राहून, चांगला आकार मिळू शकतो. फळांची गुणवत्ताही वाढते.

सीताफळ (Custard Apple) बागेच्या विश्रांतीविषयी:

  • सीताफळ बागेचे व्यवस्थापन करताना बहार घेण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी बंद करणे आवश्यक ठरते.
  • जमिनीत 40 ते 45 दिवस बागेचे पाणी बंद करावे.
  • या मधल्या काळात जुनी पाणी पूर्णपणे गळून गेलेली असतात आणि नवीन पाने येण्याचा काळ असतो तेव्हा बागेची छाटणी करून घ्यावी. त्यालाच आपण झाडाला विश्रांती देणे असेही म्हणतो.

सीताफळ (Custard Apple) पिकातील छाटणीविषयी:

  • बहार घेण्यापूर्वी झाडाच्या फांद्यांची छाटणी करणे हे फळधारणेच्या व फळांच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे.
  • बागेची छाटणी करताना जुन्या वाळलेल्या फांद्या, अनावश्‍यक व दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.
  • झाडाचा मध्य भाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. त्यामुळे पूर्ण झाडास भरपूर सूर्यप्रकाश मिळेल.
  • झाडाची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरणे यांच्याशी संबंधित आहे.
  • झाडास मिळणारा सूर्यप्रकाश कमी असल्यास फळधारणा कमी होते.
  • बागायती भागात पुष्कळदा फेब्रुवारी अखेरीस संपूर्ण पानगळ होते.

सीताफळ बागेतील छाटणीविषयी:

  • संपूर्ण पानगळ झाल्यानंतर छाटणी करावी.
  • छाटणी करताना अनावश्यक वेड्या-वाकड्या जमिनीलगत असलेल्या फांद्या काढून टाकाव्यात.
  • शास्त्रोक्त पद्धतीत मुख्य बुंध्यावर चार ते पाच मुख्य फांद्या व त्यावर आठ ते दहा दुय्यम फांद्या ठेवून छाटणी करावी.
  • पेन्सिलपेक्षा कमी आकाराच्या सर्व लहान फांद्या सिकेटरच्या साह्याने काढून टाकाव्यात.
  • झाडाची खोडे जमिनीपासून 2 ते 2.5 फुटापर्यंत मोकळी करावीत.
  • खोडावर 10 टक्के तीव्रतेची बोर्डो पेस्ट लावावी.
  • झाडांवर नवीन फूट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर 1 टक्का बोर्डोमिश्रणाची (100 ग्रॅम चुना अधिक 100 ग्रॅम मोरचूद प्रति 10 लिटर पाणी) फवारणी करावी.

छाटणीचे लाभ:

  • छाटणीमुळे झाडांची वाढ नियंत्रित करता येते.
  • झाडावर मर्यादित फळे राहिल्यामुळे ती आकाराने मोठी होतात.
  • फळांच्या गुणवत्तेत वाढ होते.

आर्द्रता व्यवस्थापन:

  • सीताफळाची फळधारणा ही बागेतील आर्द्रतेवर अवलंबून असते.
  • बहरामध्ये आर्द्रता कमी झाल्याने त्याचा बागेतील फळधारणेवर परिणाम होतो.
  • बऱ्याच वेळा चांगली फुले लागल्याचे दिसून आले तरी अपेक्षित फळधारणा होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बागेत वाढलेले तापमान आणि कमी आर्द्रता हेच होय.

सीताफळ पिकातील पाणी व्यवस्थापन:

जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणपणे:

  • हलक्या जमिनीत 30 ते 35 दिवस,
  • तर मध्यम ते भारी जमिनीत 40 ते 45 दिवसांपर्यंत पाणी तोडावे.

पाण्याची उपलब्धता असल्यास:

  • मे-जून महिन्यात महिन्यांत झाडांना पाणी देणे सुरू करावे.
  • बहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात तयार होतात.

या काळात उत्तम फळधारणा होण्यासाठी:

  • बागेमध्ये पुरेशी आर्द्रता राखून, तापमान सौम्य राहील याची काळजी घ्यावी.
  • साधारणपणे सकाळी व संध्याकाळी कमी तापमानात फुले उमलतात.
  • मादी फुलांची सक्रियता पहिल्या दिवसाच्या सकाळी अधिक असते.
  • या वेळी तापमान कमी व आर्द्रता अधिक राहिल्यास 90 टक्क्यांपर्यंत फळधारणा होऊ शकते.
  • या कालावधीत फळधारणा झाल्यावर फळे नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये काढणीस येतात.

ठिबक सिंचन पद्धतीचा वापर:

  • सीताफळ हे फळपीक कोरडवाहू असून, पाण्याची गरज तशी कमी असते.
  • ठिबक सिंचनपद्धती वापरल्यास उत्पादनाची गुणवत्ता चांगली राहून, भरीव वाढ मिळते.
  • ठिबक सिंचनामुळे 50 - 70 टक्के पाण्याची बचत होते.
  • तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

सीताफळ बागेमध्ये आच्छादनाचा वापर:

  • बागेत तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.
  • यासाठी प्लॅस्टिक आच्छादन, अथवा पालापाचोळा, ऊसाचे पाचट, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा यांचा वापर करावा.

तुमच्या सोयाबीन पिकात तुम्ही बहार व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. बहार धरणे म्हणजे काय?

बहार धरणे म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आणि तिच्या मगदुरानुसार बागेचे पाणी बंद करून बागेला ताण देणे, बागेची छाटणी व मशागत करून नंतर पाणी व खते देणे.

2. बहार का धरला जातो?

एकाच वेळी फळधारणा होण्यासाठी बहार धरला जातो.

3. सीताफळ बागेमध्ये आच्छादनाचा वापर का करावा?

सीताफळ बागेमध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.

24 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor