डाळिंब पिकातील फळगळतीची कारणे आणि उपाय

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
आपण सगळे जाणतोच की, डाळिंब ही साधारणपणे एक दाट वनस्पती आहे जी झुडुपासारखी वाढते. डाळिंबाच्या झाडाच्या मादी कळीमध्ये परागीभवन झाल्यानंतर जी गाठ तयार होते त्या अवस्थेस फळधारणा असे म्हणतात. परागीभवन हा झाडांची फळे धरून ठेवण्यासाठीचा आणि फळ न पडण्यासाठीची क्षमता सुधारण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
डाळिंबाची लागवड करताना आपल्या सगळ्यांचे उद्दिष्ट असते की , डाळिंबाला अधिक फळे यावीत. परंतु डाळिंबाच्या चांगल्या उत्पादनासाठी सर्व फुलांना फळे येणे आवश्यक आहे. फळधारणा योग्य प्रकारे होण्यासाठी आपल्याला आपल्या शेतातील पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, मधमाशी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन खूप काटेकोरपणे करणे आवश्यक असते. तरुण झाडांमध्ये मध्यम प्रमाणात फळ गळण्याची शक्यता असते. ही प्रवृत्ती तणावपूर्ण परिस्थितीत वाढते आणि चांगल्या काळजीने नियंत्रित केली जाऊ शकते. प्रौढ झाडांची फळे पडण्याची शक्यता कमी असते.
आता आपण डाळिंबाची फळे गळण्याच्या काही कारणांविषयी जाणून घेऊया तर मित्रहो, पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे डाळिंबाच्या एकूण आरोग्यावर परिणाम होऊन फळे गळू शकतात. तसेच डाळींब पिकास फुले येण्यास सुरुवात झााल्यानंतर फळे उतरुन घेईपर्यंतच्या काळात नियमित व पुरेसे पाणी देणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर फळांची वाढ होत असतांना पाण्याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्यास फळांना तडे पडतात व प्रसंगी अशी न पिकलेली फळे गळतात. एक साहजिक गोष्ट ही अशी आहे की, अपुरे परागीकरण झालेले तरुण डाळिंबाचे फळ गळते. म्हणजेच झाडांच्या बहराच्या वेळी परागण सहाय्यकांच्या (मधमाश्यांसारख्या) अपुर्या उपस्थितीमुळेसुद्धा फळगळ होऊ शकते.
आता जाणून घेऊया फळ गळ होऊ नये म्हणून वापरायचे खत, खत व्यवस्थापनाबद्दल देहात आपल्याला सुचविते की, MKP @ 5 ग्रॅम / लिटर पाणी आणि फ्लॉवरिंग स्पेशल (9:27:18) @ 5 ग्रॅम/लिटर प्रति झाड याप्रमाणे द्यावे. अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा. तसेच डाळिंब पिकाला फळधारणेच्या अवस्थेत द्यायच्या देहातच्या न्यूट्री खताविषयी माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/sB9jmvyP7yb हे वाचा.
-
वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home
-
त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
