ड्रॅगन फ्रुट ची शेती कशी कराल?
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
ड्रॅगन फळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत, मेक्सिको या भागात पाहिले जाते पण आता ते भारतात सुद्धा याची लागवड केली जाते. ही निवडुंग प्रकारातील वनस्पती आहे. हे एक विदेशी फळ असून याची लागवड संपूर्ण जगामध्ये केली जाते. या फळाचे मूळ हे उष्णकटिबंधीय आणि कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील आहे. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गुजरात राज्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या याच विशिष्ट फळाची शेती कशी करावी याविषयीची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत.
ड्रॅगन फ्रुटचे प्रकार:
ड्रॅगन फ्रुटचे तीन मुख्य प्रकार आहेत:
- रेड ड्रॅगन फ्रूट: हा ड्रॅगन फ्रूटचा सर्वात सामान्य प्रकार आहे. त्यात लाल त्वचा आणि काळ्या बिया असलेले पांढरे मांस असते.
- व्हाईट ड्रॅगन फ्रूट: या प्रकारच्या ड्रॅगन फ्रूटमध्ये पांढरी त्वचा आणि काळ्या बिया असलेले पांढरे मांस असते.
- पिवळे ड्रॅगन फ्रूट: या प्रकारच्या ड्रॅगन फ्रूटमध्ये पिवळी त्वचा आणि काळ्या बिया असलेले पांढरे मांस असते.
हवामान:
- ड्रॅगन फ्रूट ही एक उष्णकटिबंधीय वनस्पती आहे आणि ती वाढण्यासाठी उबदार हवामान आवश्यक आहे.
- हे फळ 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या भागात घेतले जाऊ शकते.
- ड्रॅगन फ्रुटला वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, म्हणून ते जास्त सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी लावणे योग्य ठरते.
जमीन:
- ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यापूर्वी, जमीन तयार करणे महत्वाचे आहे.
- जमीन तण आणि ढिगाऱ्यापासून साफ करावी.
- मातीची सुमारे 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत मशागत करावी.
- ड्रॅगन फ्रूट विविध प्रकारच्या मातीत उगवता येते, परंतु ते चांगले निचरा असलेल्या वालुकामय चिकणमातीला प्राधान्य देतात.
- मातीचा pH 5.5 ते 7.0 च्या दरम्यान असावा.
ड्रॅगन फ्रुटची अभिवृद्धी:
- याची अभिवृद्धी ही कटिंग आणि बियांपासून केली जाते.
- बियांपासून अभिवृद्धी केल्यास झाडांमध्ये वेगळेपणा दिसून येतो. त्यामुळे ही पद्धत प्रचलित नाही.
- ड्रॅगन फ्रुट च्या अभिवृद्धीसाठी कटिंग्स ही पद्धत वापरली जाते.
ड्रॅगन फ्रुट लागवड पद्धत:
- जमिनीची दोन-तीन वेळा खोल नांगरणी अशी करावी की जमीन भुसभुशीत होईल.
- दोन झाडातील अंतर 3×3 मीटर असावे.
- 40 ते 45 सेमी उंचीचे आणि ३ मीटर रुंदीचे गादीवाफे तयार करावेत.
- साधारणतः प्रति हेक्टरी 1200 ते 1300 सिमेंटचे पोल उभारावेत.
- पोल हा 12 सेमी रुंद आणि 2 मीटर उंच असावेत.
- पोल जमिनीत गाडते वेळेस साधारणतः 1.4-1.5 मीटर उंची ही जमिनीच्या वर असली पाहिजे.
- चांगल्या उत्पन्नासाठी दोन ते तीन वर्षे जुनी, आरोग्यदायी आणि 45 ते 50 सेमी उंच असलेली रोपे निवडावीत.
- पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे जून-जुलै महिन्यात लागवड करावी. लागवड ही सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस करावी.
- प्रति पोल चार रोपे याप्रमाणे लागवड करावी.
पाण्याचे नियोजन:
- या काळात पिकाला बाकी फळपिकाच्या तुलनेत खूप कमी पाणी लागते. काही महिन्यापर्यंत हे पाण्याचा ताण सहन करू शकते.
- पण फळधारणेच्या अवस्थेत एका आठवड्यात दोन वेळेस पाणी द्यावे. परंतू उन्हाळ्यात 1-2 लिटर पाणी दररोज प्रति झाड द्यावे.
खत व्यवस्थापन:
- अधिक उत्पन्नासाठी या पिकाला जास्त प्रमाणात खते द्यावी लागतात.
- सुरुवातीच्या काळात चांगल्या वाढीसाठी नत्र हे जास्त प्रमाणात द्यावे लागते. पण नंतरच्या काळात स्फुरद आणि पालाश यांची मात्रा अधिक प्रमाणात द्यावी लागते.
छाटणी:
- लागवडीपासून दोन वर्षानंतर हलक्या प्रमाणात छाटणी करावी.
- रोगट व वाकड्यातिकड्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करावी.
- तीन वर्षानंतर झाडाला छत्रीसारखा आकार द्यावा.
- छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांदीला बुरशीनाशक लावा.
कापणी:
- ड्रॅगन फळाची कापणी सामान्यतः फुलांच्या 90-120 दिवसांनी केली जाते.
- फळे जेव्हा स्पर्शास घट्ट येतात तेव्हा ती पिकली असे समजले जाते आणि त्यांचा रंग चमकदार लाल, पांढरा किंवा पिवळा असतो.
तुम्ही ड्रॅगन फ्रुटची शेती करता का? कशाप्रकारे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor