ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 July
Follow
ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून दररोज अंदाजे ५० टनाची होतेय विक्री; मागणी वाढली
राज्यातील बाजारपेठेत अंदाजे ५० टन ड्रॅगन फ्रूटची विक्री होत आहे. ड्रॅगन फ्रूटचा पहिला बहार अंतिम टप्प्यात आला आहे. बाजारपेठेत या फळाची मागणी वाढली असून गेल्या पंधरा दिवसांपासून दर टिकून आहेत. त्यामुळे ड्रॅगन उत्पादकांमध्ये काहीअंशी दिलासा मिळाला आहे. ऑगस्टच्या मध्यापासून दुसरा बहार सुरू होईल. या दरम्यान, बाजारात फळांची आवक वाढणार असून दर टिकून राहतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
53 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor