शेतामध्ये चमकणार देहातचे हायब्रीड कपाशी बियाणे DCS-1102, प्रभात मॅक्सकॉट आणि बीटी कॉटन प्रभात मार्वल! (DeHaat's hybrid Cotton seeds DCS-1102, Prabhat Maxcot and Bt cotton Prabhat Marvel will shine in the fields!)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
कपाशीचे उत्पादन 100 पेक्षा अधिक देशांमध्ये घेतले जाते. तथापि, जगातील 75 टक्के उत्पादन चीन, अमेरिका, भारत, पाकिस्तान आणि ब्राझीलमधून घेतले जाते. महाराष्ट्रात कपाशी हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कपाशीच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कपाशीचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कपाशी
पिकवणारा जिल्हा म्हणतात. पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलसंधारणशक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर कपाशीची लागवड केली जाते. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया, देहातच्या महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम अशा हायब्रीड कपाशी बियाण्यांविषयीची माहिती. त्यामध्ये DCS-1102, प्रभात मॅक्सकॉट आणि बीटी कॉटन प्रभात मार्वल या बियाण्यांचा समावेश आहे.
DCS-1102 बियाण्याची वैशिष्ट्ये:
- बोंडे जास्त व मोठी असतात.
- बोंडे चांगल्याप्रकारे उघडतात व ती काढणे देखील सोपे आहे.
- जास्त बोंडे, सर्वाधिक उत्पन्न क्षमता हे या बियाण्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.
- हे बियाणे पानांचे रोग, जिवाणू ब्लाइट, अँथ्रॅकनोज त्याचबरोबर ग्रे बुरशी, फुलकिडे, तुडतुडे या शोषक कीटकांसाठी देखील सहिष्णु आहे.
- हे वाण स्वच्छ सफेद कपाशीसाठी प्रसिद्ध आहे.
प्रभात मॅक्सकॉट बियाण्याची वैशिष्ट्ये:
- जास्त आणि मोठ्या बोंडांचे उत्पन्न.
- सिंचनाची आवश्यकता पावसावर अवलंबून असते.
- शोषक कीटक प्रतिरोधी वाण.
- उंच पसरणारी वनस्पती
- बोंडांचे वजन: 5.5-6.0 ग्रॅम
- पेरणीचा हंगाम: मे - जून
- या वाणाची बोंडे मोठी असतात, चांगल्याप्रकारे उघडतात व ती काढणे देखील सोपे आहे.
- पीक परिपक्वता अवधी 140 ते 145 दिवसांचा असतो.
बीटी कॉटन प्रभात मार्वल बियाण्याची वैशिष्ट्ये:
- मोठ्या आणि जड बोंडांचे उत्पन्न.
- या वाणाची बोंडे मोठी असतात त्यामुळे ती काढणे देखील सोप्पे आहे.
- हे वाण रसशोषक कीटकांप्रति सहनशील आहे.
- पीक परिपक्वता अवधी 140 ते 150 दिवसांचा असतो.
- उच्च उत्पादन क्षमता हे या वाणाचे वैशिष्ट्य आहे.
कपाशीच्या DCS-1102 व प्रभात मॅक्सकॉट या दोन्ही बियाण्यांच्या पेरणीसाठी एकरी 470 ग्रॅमची 2 पॅकेट्स तर बीटी कॉटन प्रभात मार्वल बियाण्याच्या पेरणीसाठी 475 ग्रॅमची 2 पॅकेट्सपुरेशी आहेत. महाराष्ट्रात उपयुक्त ठरणाऱ्या देहातच्या या विशेष वाणांविषयी अधिक माहितीसाठी कंमेंट बॉक्समध्ये आपल्याला पडणारे प्रश्न विचारा. याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कपाशीची लागवड कधी करावी?
कपाशीची लागवड मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
2. कपाशीची वेचणी कधी करायची?
कपाशी पूर्णपणे परीपक्व झाल्यावर म्हणजेच वाणांच्या परीपक्वतेच्या कालावधीनुसार साधारणतः 145 ते 160 दिवसांत कपाशीची वेचणी करावी.
3. कपाशी लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
पाण्याचा निचरा होणारी व जलसंधारणशक्ती उत्तम असणारी मध्यम ते भारी जमीन कपाशी लागवडीसाठी उत्तम समजली जाते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
