ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
देशाचा साखर हंगाम मार्च अखेर संपणार

यंदा ऊस व साखर उत्पादनात देशाची पिछेहाट होत असून देशाचा पूर्ण हंगाम मार्चअखेर लवकर संपण्याची भीती आहे. उत्तर प्रदेशात ०२३८ या उसावर आलेला 'रेड रॉट' आणि 'टॉप शूट बोरर' या रोगाचे झालेले आक्रमण त्याचवेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील उभ्या उसावर आलेला अकाली फुलोरा व त्यामुळे खुंटलेली वाढ व साखर उताऱ्यावरील प्रतिकूल परिणाम या सर्व बाबींचा नकारात्मक परिणाम यंदाच्या ऊस हंगामावर झाला आहे. कमी झालेल्या गाळप हंगामाचा विपरीत आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांवर होणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
70 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
