लाडका शेतकरी योजने विषयीची सविस्तर माहिती! (Detailed information about the Ladka Shetkari Yojana!)
![](/_next/image?url=https%3A%2F%2Fdehaat-kheti-prod.s3.amazonaws.com%2Fdjango-summernote%2F2024-12-07%2F03a84af7-6069-4ae2-ac8e-aefec014c48a.jpg&w=3840&q=75)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पादनाच्या हेतूने नव-नवीन योजना घेऊन येत असते. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे लाडका शेतकरी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे तसेच तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेती करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल व आपला देश विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. चला तर मग आता जाणून घेऊया या विशेष योजनेविषयीची माहिती.
लाडका शेतकरी योजनेचे फायदे:
- शेतकऱ्यांना 2,000 रुपये आर्थिक मदत.
- कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 5,000 रुपये.
- पीक विम्याची उर्वरित रक्कम.
- महात्मा फुले कर्ज माफी योजनेची प्रलंबित रक्कम.
- कृषी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत.
- शेतीसाठी मोफत वीज.
- ठिबक सिंचन, तुषार सिंचन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत.
- कृषी सोलार पंप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत.
लाडका शेतकरी योजनेसाठी पात्रता:
- शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- शेतकऱ्याच्या नावे शेत जमीन असावी.
- अर्जदार शेतकऱ्याकडे DBT Seeded बँक खाते असावे.
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
- शेत जमिनीची 7/12 आणि 8 अ (होल्डिंग) असावी.
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र कृषी विभाामार्फत नोंदणीकृत असावा.
लाडका शेतकरी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- शेत जमिनीचा सातबारा उतारा
- बँक खाते पासबुक
- पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
लाडका शेतकरी योजना 2024 नोंदणी:
- सर्वात पहिल्यांदा अधिकृत पोर्टल वर जा.
- वेबसाईट वर Ladka Shetkari Yojana Registration हा पर्याय निवडा.
- लाडका शेतकरी योजनेचा फॉर्म तुमच्या समोर Open होईल.
- फॉर्म मध्ये तुमचे नाव, पत्ता, शेतीची माहिती अशी सर्व महत्वाची Information भरा.
- एकदा नोंदणी झाली की नंतर तुम्हाला, पोर्टल वर Application – Ladka Shetkari Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर Ladka Shetkari Yojana Form उघडेल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
- सर्वात महत्वाचं म्हणजे शेतीची माहिती योग्य प्रकारे द्यायची आहे.
- एकदा फॉर्म भरून झाला की त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची, आणि Submit बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा.
तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. लाडका शेतकरी योजना २०२४ या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
लाडका शेतकरी योजनेसाठी अर्ज आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे करता येईल.
2. लाडका शेतकरी योजना २०२४ या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Logout हे लाडका शेतकरी योजना २०२४ या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचे संकेतस्थळ आहे.
3. लाडका शेतकरी योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
लाडका शेतकरी योजना २०२४ ही योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू झाली आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
![Get free advice from a crop doctor](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fget-help.47979653.webp&w=384&q=75)
Get free advice from a crop doctor
![download_app](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fdownload-app-bannerv2.c11782c9.webp&w=1920&q=75)