दहा लाखांवर कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळणार अर्थसाहाय्य

शासनाने अतिरिक्त अर्थसंकल्पात ९ कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली आहे. यासाठी जिल्ह्यात सुमारे १० लाख ३०,५८८ शेतकरी पात्र आहेत. यात दोन लाख ३६०५ कापूस उत्पादक, तर ७ लाख ९४,५३८ सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागल्याने या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मयदित प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
