धान उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी महत्वाची का?

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत आदिवासी विकास महामंडळ धानाची खरेदी करतात. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात संस्था आणि महामंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत उपप्रादेशिक कार्यालय चिमुर व गोंडपिपरी अंतर्गत, हंगाम 2023-24 करीता खरेदी केंद्रे धान खरेदीकरिता मंजूर केली आहेत. या केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. धान उत्पादक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान लागवड करण्यात आली आहे. यावर्षी केंद्रांवर धान विक्रीस आणण्याकरिता शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळच्या आदिवासी विकास महामंडळ किंवा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करावी.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
