तपशील
ऐका
रोग
पपई
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
1 May
Follow

पपई पिकातील रोग व्यवस्थापन (Disease management in papaya)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. पपईच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर बागेतील काही कामे प्रथमदर्शनी क्षुल्लक वाटली तरी भरघोस पीक येण्याच्या दृष्टीने त्याचे फार महत्व असते. पपई हे उष्णकटिबंधीय पीक आहे. भारतातील अंदाजे 32,500 हेक्टर जमीन पपई लागवडी खाली आहे. भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात होते. तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पपई पिकाच्या अनेक जाती आहेत. बदलत्या हवामानाचा परिणाम पपई पिकावर लवकर होत असल्याने, फळांवर उद्भवणाऱ्या रोगांमुळे पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणूनच आपण आज पपई पिकावरील रोग व त्यांचे नियोजन याविषयी जाणून घेणार आहोत.

भुरी रोग:

लक्षणे  (Symptoms):

  • रोगाची सुरवात प्रथम जुन्या पानांपासून होते.
  • भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या वर व खाली पांढऱ्या रंगाची बुरशी येते.
  • प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि वेली वाळतात.
  • पपई फळावर देखील पांढरे डाग पडतात.
  • हा रोग देठ, खोड आणि फळांवरही पसरतो. यामुळे वेलींची वाढ खुंटते.
  • रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.
  • दमट हवामानात या रोगाचा प्रभाव जास्त होतो.
  • भुरी रोग झाल्यास पाने मोठ्या संख्येने गळण्यास सुरुवात होते.

उपाय (Remedy):

  • पाण्यात मिसळणारे गंधक 400 ग्राम 200 मिली पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने पिकांवर दोन फवारण्या कराव्यात.
  • हेक्साकोनाज़ोल 5% एससी ( देहात स्लेयमाईट एफएस) 400  मिली किंवा
  • हेक्साकोनाज़ोल 5% + कैप्टन 70% ( टाटा- ताकत) 300  ग्राम किंवा
  • टेबुकोनाझोल 250 EC (25.9% w/w) (बायर - फॉलिक्युअर) 100 मिली किंवा
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एससी (देहात-ॲझिटॉप) - 300 मिली/एकर किंवा
  • अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट)  - 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.
  • पुढील फवारणी आवश्यकतेनुसार 8-10 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.

मोझॅक व्हायरस:

लक्षणे (Symptoms):

  • मोझॅक प्रथम सर्वात लहान पानांवर दिसतो.
  • पीक, संक्रमणाची वेळ आणि हवामान परिस्थिती याप्रमाणे लक्षणे बदलतात.
  • एकुणच पानांवर ठिगळासारखे किंवा विखुरलेले उंचवटलेले ठिपके, मस्से येतात आणि विविध पद्धतीने पाने विकृत होतात.
  • फळांवरील रंग समान नसतो हे आणखी एक लक्षण आहे.
  • गडद हिरवे डाग किंवा फळांच्या एरवी पिवळसर असलेल्या पृष्ठभागावर धब्बे येतात.
  • पानावरील उंचवटलेले ठिपके कालांतराने करपट डागात रूपांतरित होतात.
  • पानांना नुकसान झाल्याने, या विषाणूच्या संक्रमणाबरोबर वाढीचा दर आणि उत्पादन देखील कमी होते.

उपाय (Remedy):

  • या रोगाच्या लक्षणांकरीता तसेच माव्यांच्या उपस्थितीकरीता शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • यजमान नसलेल्या पिकांबरोबर पीक फेरपालट केल्यास विषाणूंना टाळण्यात मदत होईल.
  • आधीच्या पिकाचे अवशेष काढुन टाका.
  • मित्र किड्यांना नुकसान होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा वापर सीमित ठेवा.
  • मुंग्यांच्या संख्येचे चिकट पट्ट्या लाऊन नियंत्रण करा.
  • जमिनीवर प्लास्टिक अच्छादन वापरून माव्यांना पळवुन लावुन रोगामुळे होणारे नुकसान कमी करा.
  • प्रत्येक ओळीत पडदे बांधल्यास माव्यांचा प्रतिबंध होईल.
  • थायामेथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) ची 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली प्रति एकर किंवा
  • जिओलाइफ नो व्हायरस 400 मिली प्रति एकर किंवा
  • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (देहात - डेमाफीप) 100 ग्रॅम प्रति एकर प्रमाणात 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करावी

बुंधा सडणे:

लक्षणे:

  • पाण्याचा उत्तम निचरा न होणारी जमीन या पिकासाठी निवडल्यास बुंधा कुजतो.
  • झाडाची पाने मोठ्या संख्येने गळतात.
  • पानांचा आकार कमी होतो.
  • पाने पिवळी पडतात आणि मरगळतात.

उपाय:

  • पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. बुंध्याजवळ पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच 0.2% कॉपर ऑक्सिक्लोराईडचे द्रावण 1 लिटर या प्रमाणात एका झाडास टाकावे.
  • किंवा फोसेटाइल अल 80% डब्ल्यूपी (बायर - एलिएट) - 200 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून त्याने ड्रेंचिंग करावी.
  • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • झाडांमधील प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी जिओलाईफ कंपनीच्या नो व्हायरसची - ४०० मिली प्रति एकर प्रमाणात फवारणी करावी.

करपा रोग:

लक्षणे:

  • बहुतांश वेलवर्गीय भाज्यांमध्ये पानावर पानथळ, लहान, पिवळसर आणि नंतर तपकिरी ठिपके पडतात.
  • रोगग्रस्त पाने करपतात.
  • पानांचे देठ आणि वेलीवर रोगाचे ठिपके पडून पाने व वेली सुकून वाळतात.
  • करपा रोगामुळे पानांच्या कडा काळसर पडतात.
  • संपूर्ण पाने वाळण्यास सुरुवात होते.
  • पाने गळून पडतात.

उपाय:

  • पिकाची फेरपालट करावी.
  • रोगविरहित फळांचे बी वापरावे.
  • जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
  • पिकाची लागवड मंडप अथवा ताटी पद्धतीने करावी.
  • वेलीचा संपर्क जमिनीशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने, फळे काढून नष्ट करावी.
  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलोने बियाण्याची प्रक्रिया करावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच किंवा लागवडीनंतर 45 दिवसांनी,
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • अँथ्रकनोज नियंत्रणासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 300 मिलीची 200 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.

तुम्ही तुमच्या पपई पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पपई पिकाची लागवड कधी केली जाते?

पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात.

2. पपई पिकात कोणते रोग आढळून येतात?

पपई पिकात भुरी, मोझॅक व्हायरस, बुंधा सडणे तसेच करपा असे मुख्य रोग आढळून येतात.

3. महाराष्ट्रात पपई लागवडीचे क्षेत्र कोणते?

महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

59 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor