तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Jan
Follow

दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान, शेतकऱ्यांना फायदा होणार का?

काही दिवसांपूर्वीमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलयांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दूध दर अनुदानची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारची मंत्री मंडळ बैठक पार पडली. त्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या बैठकीत महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले. यात दुधासाठी शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सहकारी दूध संघाकडे दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून पाच रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.


46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor