ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Mar
Follow
दूध संकलनाची माहिती द्या, अन्यथा कारवाई करू; नाशिक जिल्हा परिषदेचा इशारा
पुणे: जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान नाशिक जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दूध संकलन केंद्रांना आदेश काढत, 'दूध संकलनाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाना द्या', असे म्हटले आहे. तसेच 'ज्या संस्था माहिती देत नाहीत किंवा देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करा', अशा सूचना देखील जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांच्या लढ्याला यश आले आहे. तर दूध संकलन केंद्रांना दूध संकलनाची माहिती ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक असणार आहे.
43 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor