तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

दूधदर वाढवून द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू

महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. विविध राज्यांत शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.


58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor