फरसबी मधील प्रमुख कीटक आणि व्यवस्थापन (French Bean: Major Insects, Symptoms and Control)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
फरसबी (फ्रेंच बीन) ची लागवड भारतात मोठ्याप्रमाणात केली जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात. फरसबी ही शेंगावर्गीय असल्याने चवीला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे. फरसबी हे खरिपात घेतले जाणारे कमी कालावधीचे पीक आहे. आजच्या आपल्या या लेखात आपण फरसबीमधील प्रमुख कीटकांविषयी आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
शेंडे व फळ पोखरणारी अळी (French Bean Borer):
शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीची ओळख (Identification of French Bean borer):
- अळी तपकिरी रंगाची असून, शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात.
- सुरवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्याना पोखरून आत भुयार तयार करते.
शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms of Borer):
- फुलांवर, कळ्यांवर खाल्ल्याची चिन्हे दिसतात.
- कोवळे फुटवे तसेच काटक्या मरगळतात.
- शेंगांवर आत शिरल्याची आणि बाहेर पडल्याची छिद्रे विष्ठेने बंद केलेली दिसतात.
- फळातील गर नष्ट होऊन विष्ठेने फळ भरते.
- अळ्या गुलाबी रंगाच्या असुन डोके तपकिरी असते.
शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन (Management of Borer):
- प्रति किलो बियाण्यावर 1.5 ते 4 मिली इमिडा 30% एसएल (देहात - असेर एफएस) ने बीजप्रक्रिया करावी.
- कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास इमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-Illigo) किंवा
- थाईमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात-Entokill) किंवा फ्लुबेन्डियामाइड 39.35% एससी (बायर-फेम) 600 मिलीची 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी.
पांढरी माशी (French Bean White Fly):
पांढऱ्या माशीची ओळख (Identification of French Bean White fly) :
- पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
- रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
- या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
- कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
- पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.
पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms of White fly):
- पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
- या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in chilli) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
- झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
- या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन (Management of White fly):
- प्रति एकर शेतात 20-25 पिवळे चिकट सापळे वापरा.
- कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
- याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा किंवा
- थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी (पीआय इंडस्ट्रीज - करीना) 400 मिली प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
लाल कोळी (French Bean Red Mite):
लाल कोळीची ओळख (Identification of French Bean Red Mite) :
- लाल कोळी तांबूस नारंगी रंगाचे असतात.
- पाठीवर दोन गडद ठिपके असतात.
- लाल कोळीची अंडी गोलाकार व पारदर्शक असतात.
लाल कोळीची लक्षणे (Symptoms of Red Mite):
- पानांच्या खालच्या बाजुला किंवा पानांवर कोळ्यांच्या लाल वस्त्या दिसतात.
- कोळ्यांनी टाकलेली बरीचशी पांढरी कात देखील दिसते.
- पानांच्या कडा पिवळ्या पडतात आणि पिवळे किंवा करपट भाग देखील विकासित होतात.
लाल कोळीचे व्यवस्थापन (Management of Red Mite):
- नियंत्रणासाठी डायफेंथियूरोन 50% डब्ल्यूपी (सिजेंटा - पेगासस) 200 ग्रॅम प्रति एकर किंवा
- प्रोपरगाईट 57% ईसी (ओमाईट- धानुका) 400 मिली प्रति एकर किंवा
- स्पाइरोमेसिफेन 240 एससी 22.9% डब्ल्यू/डब्ल्यू (बायर - ओबेरॉन) 200 मिलीची प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
तुमच्या फरसबीच्या पिकात वरील पैकी कोणते रोग व कीटक दिसून आले? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. फरसबीची लागवड केव्हा करता येते?
फरसबी (फ्रेंच बीन) वर्षातून दोनदा दोन वेगवेगळ्या हंगामात पेरता येते. पेरणीची वेळ शेताच्या प्रकारानुसार बदलते. जानेवारी - फेब्रुवारी मध्ये आणि जुलै - सप्टेंबर मध्ये फरसबीची लागवड करता येते.
2. फरसबी किती दिवसात तयार होते?
फरसबी लावल्यानंतर सुमारे 50-60 दिवसांत तयार होते.
3. फरसबीच्या पिकापासून किती उत्पादन मिळते?
फरसबी पासून एकरी उत्पादन सुमारे 9 ते 10 टन आणि हिवाळ्यातील लागवडीचे उत्पादन 15 टनांपर्यंतही जाते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor