जनावरांसाठी बुरशीजन्य विषबाधा घातक! (Fungal poisoning is dangerous for Animals!)
नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
बुरशीजन्य विषबाधा, ज्याला सामान्यतः मायकोटॉक्सिकोसिस असेही म्हणतात, हा एक प्रकारचा रोग आहे जो विषारी पशुखाद्यामुळे होतो. गुरांच्या चाऱ्यात असलेल्या बुरशीच्या काही कणांमुळे हे विष तयार होते. बुरशीचे अनेक प्रकार आहेत ज्यांच्यामुळे अनेक प्रकारचे विष बनते. हा रोग प्रामुख्याने पॅथॉलॉजिकल क्लिनिकल इन्फेक्शन्सच्या स्वरूपात प्राण्यांमध्ये आढळतो आणि अशा परिस्थितीत त्याचे निदान करणे फार कठीण मानले जाते. ही समस्या जगातील बहुतेक देशांमध्ये आढळून येते परंतु ज्या देशांमध्ये जास्त आर्द्रता असते तिथे ही समस्या जास्त प्रमाणात असते. काही बुरशींपासून तयार होणाऱ्या दुय्यम पदार्थांमुळे जनावरांना विषबाधा होत असते. अशा प्रकारची विषबाधा जास्त प्रमाणात झाल्यास काही जनावरांचा मृत्यू देखील होतो. बुरशीजन्य विषबाधेचा प्रसार हा संसर्गजन्य आजारासारखा 'एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरास होत नाही. विशिष्ट ऋतूमध्येच ही बुरशीजन्य विषबाधा दिसते. बऱ्याच बुरशी जनावरांची प्रतिकार शक्ती कमी करतात. त्यामुळे अशी जनावरे जिवाणूजन्य, विषाणूजन्य आजारांना बळी पडतात. बुरशीजन्य विषबाधेवर प्रतिजैविकांचा परिणाम होत नाही. काही बुरशीची वाढ विशिष्ट पशुखाद्यांमध्ये होते.
अफ्लाटॉक्सीन विषबाधा:
- अफ्लाटॉक्सीनमुळे होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण अधिक आहे.
- हा पदार्थ अस्परागस फ्लावस आणि अस्परागस परासायटीकास बुरशीपासून तयार होतो.
- ही बुरशीजन्य विषबाधा सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते.
- अफ्लाटॉक्सीनचे प्रमाण साठवलेले धान्य जसे की, गहू, ज्वारी, तांदूळ, सोयाबीन, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड आणि इतर सर्व पेंडीमध्ये अधिक प्रमाण तयार होते.
- जेव्हा वातावरणातील आर्द्रता 15 टक्के आणि तापमान 25 ते 32 अंश सेल्सिअस असते, तेव्हा धान्यामध्ये तयार झालेले अफ्लाटॉक्सीन बरीच वर्ष टिकते.
- या बुरशीचा संपर्क पीक शेतात असताना, धान्य मळणी करताना किंवा अयोग्य साठवण केल्यास होतो.
विषबधेची लक्षणे:
तीव्र प्रकार
- जनावरांनी अफ्लाटॉक्सीनयुक्त धान्य किंवा पशुखाद्य अधिक प्रमाणात खाल्लेले असते. तेव्हा या प्रकारची विषबाधा अनेक जनावरांना होते.
- काही जनावरांचा तत्काळ मृत्यू देखील होतो.
लक्षणे
- जनावरे अशक्त बनतात.
- चारा पाणी खात नाहीत.
- सुस्त बनतात.
- काही जनावरांच्या तोंड, नाक आणि शेणातून रक्त पडते.
- जनावरांना हगवण लागते.
मध्यम प्रकार
विषबाधा जनावरांनी अफ्लाटॉक्सीन कमी प्रमाण पशुखाद्यातून तीन महिन्यापर्यंत खाल्ल्यास होते.
लक्षणे
- जनावरांना कावीळ होते.
- जनावरे दात खातात, झटके येतात.
- जनावरांच्या अंगाला खाज सुटते.
- शरीरांतर्गत रक्तस्राव होतो.
सौम्य प्रकार:
जनावरांनी अफ्लाटॉक्सीन कमी प्रमाण पशुखाद्यातून सहा महिन्यांपर्यंत खाल्ल्यास या प्रकारची विषबाधा होते.
लक्षणे
- विषबाधा जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसते.
- जनावरांची पचन शक्ती, क्रय शक्ती कमी होते.
- तब्येत कमी कमी होत जाते.
- दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी होते.
- गाभण जनावरांचा गर्भपात होतो.
- कोंबड्यामध्ये अंडी उत्पादन तसेच मांस उत्पादन कमी होते.
- प्रतिकार शक्ती खूप कमी होते त्यामुळे जनावरे जिवाणू व विषाणूजन्य आजारांना बळी पडतात.
- वेळेत उपचार न भेटल्यास जनावरांचा मृत्यू होतो.
प्रतिबंधक उपाययोजना:
- विषबाधेवर खात्रीशीर उपचार उपलब्ध नसल्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा ठरतो.
- बुरशीयुक्त चारा, पशुखाद्य जनावरांना खाऊ घालणे बंद करावे.
- काही शेतकरी कमी खर्चात पशुखाद्य बनविण्यासाठी कमी प्रतीचे धान्य खरेदी करतात. ते धान्य बुरशीयुक्त नाही याची खात्री करून वापरावे.
- बुरशीयुक्त चारा कापणी करताना वेगळा करून ठेवावा, तो चांगल्या चाऱ्यासोबत मिसळू नये.
- पशुखाद्याची साठवण ओलसर ठिकाणी करू नये.
- बुरशीयुक्त धान्याचा भरडा किंवा मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.
- विषबाधित जनावरांना जादा प्रथिनयुक्त पशुखाद्य, जीवनसत्त्व ई, सेलेनीयमचा पुरवठा करावा.
- विषबाधित जनावरांना दुय्यम प्रकारचा आजार झाला असल्यास पशुतज्ज्ञांकडून योग्य उपचार घ्यावा.
तुम्ही तुमच्या जनावरांचे बुरशीजन्य विषबाधेपासून कशाप्रकारे संरक्षण करता? या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. जनावरांमध्ये बुरशीजन्य विषबाधा कशी होते?
काही बुरशींपासून तयार होणाऱ्या दुय्यम पदार्थांमुळे जनावरांना विषबाधा होत असते. अशा प्रकारची विषबाधा जास्त प्रमाणात झाल्यास काही जनावरांचा मृत्यू देखील होतो.
2. बुरशीजन्य विषबाधेचे प्रमुख कारण काय?
काही शेतकरी कमी खर्चात पशुखाद्य बनविण्यासाठी कमी प्रतीचे धान्य खरेदी करतात हे एक बुरशीजन्य विषबाधा होण्याचे महत्वाचे कारण आहे.
3. अफ्लाटॉक्सीनचे प्रमाण कशामध्ये जास्त असते?
अफ्लाटॉक्सीनचे प्रमाण साठवलेले धान्य जसे की, गहू, ज्वारी, तांदूळ, सोयाबीन, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड आणि इतर सर्व पेंडीमध्ये अधिक प्रमाण तयार होते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor