तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 June
Follow

गाईच्या दूध दरात पुन्हा लिटरमागे दोन रुपयांची घट

उन्हामुळे दुधाच्या दरात तीस टक्क्यांपर्यंत घट झाली. पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न, पशुखाद्याचे वाढते दर यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेला असताना काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटरचा २९ रुपयांचा दर पुन्हा २७ रुपयांवर आला आहे. दोन रुपये दर कमी केल्यापासून दूध उत्पादकांना दर दिवसाला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक तर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ३४ रुपये दर दिला जात नसल्याने प्रति लिटरला सात रुपयांप्रमाणे दररोज १५ कोटी रुपयांपेक्षा आर्थिक फटका बसत असल्याने दूध उत्पादक पुरते हैराण झाले आहे.


36 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor