लसूण पिकातील खत व्यवस्थापन (Garlic crop Fertilizer Management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
लसूण हे कंदर्प कुळातील एक मसाल्याचे पीक आहे. आहारात लसणाचे खूप महत्व आहे. लसणाचा वापर प्रत्येक भाजीमध्ये केला जातो. लसूण प्रामुख्याने मसाल्यांमध्ये वापरली जाते. लसणाचे औषधी गुणधर्म देखील आहेत. यामुळे या लसणाला वर्षभर मागणी असते. लसणाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. भारत आणि चीन हे लसूण पिकवणारे जगातील प्रमुख देश आहेत. या पिकाच्या लागवडीत मध्यप्रदेश आघाडीवर असून त्यानंतर ओडिसा, गुजरात आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो. सध्या लसुन लागवडीचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये बहुतांशी भागात वाढत आहे. अशा या अधिक नफा देणाऱ्या लसणाच्या उत्पादनात योग्य खत व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण लसूण पिकातील खत व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
लसूण पिकातील खत व्यवस्थापन:
लसूण लागवडीच्या आधी 1 दिवस करावयाचे खत व्यवस्थापन (बेसल डोस) : सर्व खते मिक्स करून मातीमध्ये मिसळावीत किंवा बेड वर लागवड करणार असल्यास बेड भरून घ्यावेत.
- डी.ए.पी. - 50 किलो प्रति एकर
- एम.ओ.पी. (पोटाश) - 50 किलो प्रति एकर
- सल्फर - 8 किलो प्रति एकर
- मायक्रोनुट्रीएंट खत - 10 किलो प्रति एकर
- देहात स्टार्टर - 4 किलो
लागवडीनंतर 15 दिवसांनी ड्रीपद्वारे किंवा पाटपाण्याने रोपांच्या मुळांच्या विकासासाठी आणि पिकाच्या चांगल्या वाढीसाठी करावयाचे खत व्यवस्थापन:
- 19:19:19 (देहात न्यूट्री एनपीके) - 2 किलो प्रति एकर
- ह्यूमिक एसिड (देहात पंच) - 1 किलो प्रति एकर
लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी दोन्ही खते प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 19:19:19 (देहात न्यूट्री एनपीके) - 50 ग्रॅम
- न्यूट्री वन बूस्ट मास्टर - 30 मिली
लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 12:61:00 (देहात न्यूट्री एमएपी) - 70 ग्रॅम
- चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट - 15 ग्रॅम
लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 13:00:45 (देहात न्यूट्री केएनओ3) - 75 ग्रॅम
- न्यूट्री कॅल्शिअम नायट्रेट विथ बोरॉन - 75 ग्रॅम
लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 00:52:34 (देहात न्यूट्री एमकेपी) - 75 ग्रॅम
- न्यूट्री वन बोरॉन 20% - 15 ग्रॅम
- समुद्री शेवाळ अर्क - 15 ग्रॅम
लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 00:00:50 - 75 ग्रॅम
- चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट - 15 ग्रॅम
वरील सर्व खते देताना अमलात आणायच्या महत्त्वाच्या गोष्टी -
- वरील खतांचा डोस मातीपरीक्षण अवहालानुसार बदलू शकतो.
- फवारणी करताना प्रत्येक वेळी स्टिकरचा वापर करावा.
- फवारणी करताना शेतात ओलावा असणे आवश्यक आहे.
- नमूद केलेली खते जास्त प्रमाणात देऊ नये.
- पिकावर सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
- फवारणी मध्ये बुरशीनाशके आणि खत मिसळताना कृषी तंज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.
तुम्ही तुमच्या लसूण पिकात कोणती खते वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. लसूण लागवड केव्हा केली जाते?
लसणाची लागवड रब्बी हंगामात केली जाते.
2. लसूण लागवडीस योग्य हवामान कोणते?
लसूण लागवडीस समशितोष्ण हवामान उपयुक्त असते.
3. लसूण लागवडीस योग्य जमीन कोणती?
मध्यम खोलीच्या भरपूर सेंद्रीय खते घातलेल्या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत लसूण पीक चांगल्याप्रकारे घेता येते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor