घोसाळ्याचे हायब्रीड DHS 2402 वाण उत्पादन वाढवेल हमखास

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
संपूर्ण जगभरात जिचे उत्पन्न घेतले जाते अशा एका भाजीच्या विशेष वाणाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ही संपूर्ण माहिती आपल्याला या भाजीच्या उत्तम उत्पादनासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पूर्ण माहिती वाचाचं बरं का. घोसाळे ही भाजी फार प्राचीन असून मूळची भारतातीलच आहे हे माहीत आहे का तुम्हाला?
मात्र वेळेअनुसार आणि मागणीनुसार भारतासह इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स व कॅरिबियन बेटे, अमेरिका या सर्व देशांमध्ये घोसाळ्याची लागवड पुष्कळ प्रमाणात केली जात आहे. घोसाळे हे पीक घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते. घोसाळे वेलीवर येतात. हे घोसाळ्याचे पीक इतर देशांमध्ये घेतले जाण्याचे महत्वाचे कारण आहे.
घोसाळे या वेलभाजीला मांडव, बांबू इत्यादी प्रकारांचा आधार दयावा लागतो. घोसाळे या पिकाखाली महाराष्ट्रातील जवळ-जवळ 1147 हेक्टर क्षेत्र आहे. घोसाळ्याला नेहमीच बाजारपेठेत मागणी असते म्हणूनच, आपल्यासाठी देहात एक असे वाण घेऊन आले जे लावल्याने आपल्याला चांगले उत्पादन घेता येऊ शकेल. चला तर मग जाऊन घेऊया घोसाळ्याच्या DHS 2402 या हायब्रीड वाणाविषयीची माहिती.
तर बंधूंनो, घोसाळ्याचे DHS 2402 हे वाण एकसमान आकाराच्या, चकचकीत, पातळ लांब तसेच गडद हिरव्या रंगाच्या फळांचे उत्पादन देते. हे वाण पेरणीनंतर अवघ्या 50-55 दिवसांत कापणीसाठी तयार होते. या वाणाच्या फळांची लांबी 22-24 सेमी तर रुंदी 3-3.5 सेमी एवढी असते. या वाणाच्या फळांचे वजन 120-150 ग्राम इतके असते जे बाजारात आपल्याला चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. उच्च उत्पादन क्षमता आणि चांगली LCV सहिष्णुता हे या वाणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मग खरेदी करताय ना? काही प्रश्न आहेत का? अहो मग चिंता कशाला आमच्या टोल फ्री नंबर 1800-1036-110 वर संपर्क साधा अथवा कंमेंट बॉक्समध्ये आपल्याला पडलेले प्रश्न लिहून पाठवा.
-
देहातने भेंडीच्या अशाच आपल्यासाठी आणलेल्या काही विशेष वाणांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी https://dehaat-kisan.app.link/dV879BWvUyb ही माहिती वाचा आणि आपले उत्पादन व उत्पन्न वाढावा.
-
वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home
-
त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
