तपशील
ऐका
गहू
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
1 year
Follow

गहू लागवड तंत्रज्ञान

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. महाराष्ट्रातील गव्हाचे प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादन 1,558 किलो आहे. आज आपण महाराष्ट्रात जेवणात अनन्य साधारण महत्व असणाऱ्या याच गव्हाच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत.

जमीन:

पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन आवश्‍यक असते.

हवामान:

  • गहू पिकाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते.
  • पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्‍यकता असते.
  • दाणे भरण्याच्या वेळी 25 डिग्री सें. तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन त्याचे वजन वाढते.

पूर्वमशागत:

  • खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची 15 ते 20 सें.मी. खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुसीत करावी.
  • शेवटच्या कुळवणीआधी हेक्‍टरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे.
  • पूर्वीच्या पिकांच धसकटे व अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.

पेरणीची वेळ:

  • जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी.
  • बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.

पेरणी:

  • दोन ओळीतील अंतर 22.5 ते 23.0 सें.मी. ठेवून पेरणी करावी. बी 5 ते 6 से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नका.
  • उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी. म्हणजे पेरणीबरोबरचा रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल.
  • जमिनीच्या उतारानुसार 2.5 ते 3.0 मीटर रूंदीचे सारे पाडावेत व आडव्या दिशेने पाट पाडावेत.

बियाणे:

  • गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी 20 ते 22 लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरताना एकरी 50 ते 60 किलो बियाणे वापरावे.
  • उशीरा पेरणीसाठी एकरी 50 ते 60 किलो बियाणे वापरावे आणि पेरणी 18 सें.मी. अंतरावर करावी.
  • जिरायत गव्हासाठी एकरी 30 ते 40 किलो बियाणे वापरावे व 22.5 सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

बीजप्रक्रिया:

  • पेरणीपूर्वी बियाणास धानुका - विटावॅक्स पॉवर - (कार्बोक्सिन 37.5%+थिरम 37.5% डब्ल्यू एस) या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी, तसेच प्रति 10 किलो बियाण्यासाठी ॲझोटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन:

जिरायत पेरणी

बेसल डोस - DAP - 50 किलो, MOP- 15 किलो + Starter 4 किलो पेरणीवेळी द्यावा.

बागायत वेळेवर पेरणी

बेसल डोस - यूरिया 30 किलो, DAP - 50 किलो, MOP - 15 किलो + स्टार्टर 4 किलो

21 - 25 दिवसांनी - यूरिया 25 किलो + स्टार्टर 4 किलो + झिंक सल्फेट - 5 किलो

बागायत उशिरा पेरणी

प्रत्येकी 40 किलो नत्र स्फुरद व पालाश प्रतिहेक्‍टरी पेरणीच्या वेळी व 40 किलो नत्र प्रतिहेक्‍टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.

पाणी व्यवस्थापन:

पिकाला पाणी देताना खालील पीक अवस्था महत्वाच्या मानल्या जातात:

  • मुकुटमुळे फुटण्याची वेळ 18 ते 21
  • कांडी धरण्याची वेळ 40 ते 45
  • पीक ओंबीवर येण्याची वेळ 60 ते 65
  • दाण्यात चीक भरण्याची वेळ 80 ते 85

सुधारित जाती

बागायत वेळेवर पेरणी

1) सरबती जाती:

  1. फुले समाधान
  2. त्र्यंबक
  3. तपोवन

बागायती उशिरा पेरणीसाठी

  1. फुले समाधान
  2. एकेएडब्ल्यू - 4627

पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास

  1. एनआयएब्ल्यू - 1415 (नेत्रावती)
  2. एचडी 2987 (पुसा बहर)

२) बन्सी जाती:

बागायती वेळेवर पेरणी

  1. एनआयडीडब्ल्यू - 295(गोदावरी)
  2. एमएसीएस- 4028
  3. एमएसीएस- 4058

३) नवीन प्रसारित जाती

  1. फुले समाधान (एनआयएडब्ल्यू 1994)
  2. फुले सात्त्विक (एन.आय.ए.डब्ल्यू.3170)
  3. एनआयडीडब्ल्यू - 114

आंतरमशागत:

  • पेरणीनंतर 25-30 दिवसांनी - टाटा मेट्रीची फवारणी- 140 ग्रॅम प्रति एकर (मेट्रिबुजीन 70% डब्ल्यू पी)

याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

  • वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home
  • त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre

51 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor