ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
गोंदिया जिल्ह्यात हमीभावाने २७ कोटींचे धान खरेदी

गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या हमीभाव केंद्रावर आता धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढीस लागली आहे. आठ दिवसांच्या कालावधीत फेडरेशनच्या एकूण ८३ केंद्रांवरून १ लाख १७ हजार ५७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आतापर्यंत जिल्ह्यात ८३ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ७१ हजार ४२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार १६४ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे.
25 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
