ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
'गोकुळ'कडून दूध उत्पादकांना ११३ कोटींचा दिवाळी फरक

"कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) म्हैस व गाय अंतिम दूध दर फरकापोटी ११३ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या बँकेतील खात्यावर शुक्रवारी (ता. ११) जमा करण्यात येणार आहे. ही 'गोकुळ'च्या लाखो दूध उत्पादकांना दिलेली दीपावली भेट आहे,” अशी माहिती 'गोकुळ'चे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली. डोंगळे म्हणाले, की गेल्या आर्थिक वर्षात दूधपुरवठा केलेल्या म्हशीच्या दुधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ५० पैसे व गायीच्या दुधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे.
44 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
