हरभरा पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन (Gram: Some major Insects and their management)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
आपण तर जाणताच की, भारतात हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक आहे. महाराष्ट्रात एकूण 13.53 लक्ष हेक्टर क्षेत्र हरभरा पिकाचे असून उत्पादन 11.80 लाख टन एवढे आहे. हरभरा हे हिवाळी ऋतुतील पिक असून या पिकास रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18 ते 26 अं.से. आणि 21 अं.से. दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. प्रखर सुर्यप्रकाश असल्यास हे पिक जास्तीत जास्त उत्पादन देते. मात्र हरभरा पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण हरभरा पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
हरभरा पिकात आढळून येणाऱ्या किडी:
- घाटे आळी
- वाळवी
- देठ कुरतडणारी अळी
- उंट अळी
- मावा
- कडधान्य भुंगेरे
घाटे अळी:
घाटे अळी ही खूप खाणारी अळी असून ती कोवळी पान, फुल, कळ्या आणि घाट्या, कोवळी पाने, सर्व काही खावुन टाकते.
लक्षणे:
- अळी बाल अवस्थेत असताना पिवळ्या, गुलाबी, काळ्या किंवा राखडी रंगाची असुन कोवळी पाने व फांद्या यांवर आपली उपजीविका करते.
- दुसऱ्या अवस्थेत पाने, कळ्या, फुले खाते.
- तिसऱ्या अवस्थेत घाट्यांना छिद्र करून दाणे खाते.
उपाय (Remedy):
- सहनशील जातींची लागवड करावी.
- खोल नांगरट करावी.
- लवकर पिकणाऱ्या जातीं बरोबर मोहरी, जवस, बोरलीचे आतंरपिक घ्यावे.
- अळी खाणाऱ्या पक्ष्याला थांबण्यासाठी टी आकाराचे पक्षी थांबे तयार करावे.
- घाटे अळीच्या नर पतंगास आकर्षित करण्यासाठी प्रति एकरी 5 कामगंध सापळे उभारावे. जेणेकरून किडींची संख्या नियंत्रित करता येईल.
- अळीची सुरुवातीची अवस्था दिसल्यास निम तेल 10000 पी.पी.एम. किटकनाशक 25 मिली आणि स्टिकर 2 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
- स्पिनोसॅड 45% एससी (बायर - स्पिनटोर) 100 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा
- क्लोरोपायरीफॉस 20% ईसी (टाटा रॅलीस - तफाबान) 1 लिटर/प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- फुलं दिसू लागताच क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू एससी (FMC - कोराजन) 6 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केल्यास पुढील 30 दिवसांसाठी पिकाचे अळी सोबत इतर किडींपासून नियंत्रण होते.
- या किडीचा प्रादुर्भाव सहसा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर सुरु होताना दिसतो. पिकास फुले व शेंगा लागल्यानंतर तो वाढलेला आढळतो.
वाळवी:
हा कीटक कोरड्या जमिनीत अढळुन येतो. मुरमाड व हलक्या गाळाच्या जमिनीत वाळवीचे प्रमाण जास्त असते. हा समुहाने राहणारा कीटक असुन तो अनेक पिकांवर उपजीविका करतो. याला पांढरी मुंगी असे म्हणुन देखील ओळखले जाते. वाळवी पेरणी केल्या नंतर लगेच दिसण्यास सुरू होते व ती झाडे लहान असतानाच खाऊन टाकते.
लक्षणे:
- मुरमाड व हलक्या गाळाच्या जमिनीत याचा प्रादुर्भाव जास्त असतो.
- नवीन उगवलेल्या रोपांचे हा कीटक नुकसान करतो.
- कीडग्रस्त झाडे सुकतात, कोरडी पडतात.
- मोठी झाडे सावकाश कोरडी पडून मरतात.
उपाय (Remedy):
- क्लोरोपाइरीफॉस 20% ईसी (टाटा-तफाबान)10 मिलीने प्रति क्विंटल बियाण्यावर प्रक्रिया करावी.
- क्लोरोपाइरीफॉस 20% ईसी (टाटा-तफाबान) 1 लिटर/प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
देठ कुरतडणारी अळी:
ही कीड मुख्यतः ज्या भागात सेंद्रीय पदार्थ जास्त आहेत अशा शेतात दिसून येते. ही अळी दिवसा लपून राहते आणि रात्री जमिनीलगतची झाडाची देठ किंवा फांद्यां कुरतडुन वेगळ्या करते आणि मातीत घेऊन जाऊन खाते. त्यामुळे लहान रोप किंवा फांद्या शेतात पसरलेल्या दिसतात. या फांद्यांच्या खाली अळी लपुन बसलेली असते.
लक्षणे:
- ही कीड फक्त रात्रीच्या वेळी कार्यक्षम होते.
- नवीन झाडांना जमिनी लगत तोडुन टाकते.
- जमिनी लगतच्या फांद्यांना कुरतडुन झाडा पासुन वेगळ करते.
- झाडांच्या खालील माती उकरून बघितल्यास अळ्या दिसुन येतात.
उपाय (Remedy):
- उन्हाळयात खोल नांगरट करून जमीन चांगली तापु द्यावी.
- अर्धवट कुजलेले पुर्वीच्या पिकाचे अवशेष शेता बाहेर काढावेत.
- क्लोरोपाइरीफॉस 20% ईसी (टाटा-तफाबान) 1 लिटर प्रति क्विंटल बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
- क्लोरोपाइरीफॉस 20% ईसी (टाटा-तफाबान) 1 लिटर/प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर खोडा जवळ मातीत सोडावे.
उंट अळी:
ही सर्व भारततात हरभरा पिकावर कमी प्रमाणात अढळून येते.
लक्षणे:
- चालताना शरिराचा मधला भाग उंच करून चालते.
- ही हिरव्या रंगची अळी आहे.
- झाडाचा जो भाग तिने खाल्लेला असतो तिथेच ती दिसुन येते.
- पान, फुल, कळी आणि कवळी घाटे खाते.
- अळी दाण्या सकट घाटयाचे कवच पण खाते.
उपाय (Remedy):
- वनस्पतीजन्य किटकनाशक
- कडुनिंबाच्या पानाचा रस, निंबोळीचे तेल, करंज तेल ही वनस्पतीजन्य कीटकनाशक वापरावीत.
- क्लोरोपाइरीफॉस 20% ईसी (टाटा-तफाबान) 1 लिटर/प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम प्रति एकर २०० ली पाण्यात मिसळून फवारणी करा किंवा
- थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
मावा:
मावा हा किडा फार कमी प्रदेशात अढळुन येतो.
लक्षणे:
- काही प्रदेशात उशिरा पेरणी केल्यानंतर याचा प्रादुर्भाव होतो.
- ही किड कोवळ्या फांद्या आणि घाटे यांच्यातला अर्क पिवुन घेते त्यामुळे फांद्या सुकतात आणि दाणे लहानच राहतात.
उपाय (Remedy):
- निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 12 ते 20 ग्रॅम एकरी फवारावे किंवा
- फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 100 मिली/ 200 लिटर एकरी फवारावे किंवा
- बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली/एकरी फवारावे.
कडधान्य भुंगेरे:
हा दाणे साठवून ठेवण्याच्या वेळेत नुकसान करतो.
लक्षणे:
- देशी हरभऱ्यापेक्षा जास्त काबुली हरभऱ्यावर प्रार्दुभाव करतो.
- ओले दाने सोडून ठेवले तर हा कीटक जास्त लागतो.
उपाय (Remedy):
दाणे चांगले उन्हात वाळवून साठवणे.
दाणे न साठवता त्याची डाळ करून साठवणे.
बिजप्रक्रिया (दाने साठविण्या आधी)
मोहरी तेल, खोबरेल तेल 10 ग्रॅम / किलो दाणे वापरावे.
तुम्ही तुमच्या हरभरा पिकामधील प्रमुख किडींचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. हरभरा पिकाची लागवड कधी करावी?
हरभरा पिकाची लागवड जिरायती पिकासाठी सप्टेंबेर अखेर ते 15 ऑक्टोबर तर बागायती पिकासाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान करावी.
2. वाळवी हा कीटक कोणत्या जमिनीत आढळून येतो?
वाळवी हा कीटक कोरड्या जमिनीत अढळुन येतो. मुरमाड व हलक्या गाळाच्या जमिनीत वाळवीचे प्रमाण जास्त असते.
3. हरभरा हे कोणत्या हंगामातील पीक आहे?
हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor