हमीदराने मका खरेदीसाठी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी
बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भरडधान्य मका हमीदराने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवार (ता. 30) पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. मका खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यासाठी 16 खरेदी केंद्रांना मान्यता दिलेली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव, संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी अंजनी बुद्रुक केंद्र साखरखेर्डा, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्यूसर कंपनी देऊळगावराजा केंद्र सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड नांदुरा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था, चिखली, ऑर्गसत्व ऑर्गनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी देऊळगावराजा, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर केंद्र वरवट बकाल, बिबी फार्मर प्रोड्यूसर कंपनी बिबी या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा पणन अधिकारी यांनी सदर ठिकाणी मका खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिले आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor