तपशील
ऐका
रोग
भात
कीटक
कृषी ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
3 Sep
Follow

भाताचे खोड किडा, जिवाणूजन्य करपा आणि मुळ कुज रोगापासून संरक्षण कसे करावे (How to protect Rice crop from Stem borer, Bacterial blight and Root rot)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो म्हणूनच आपल्या देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. भारतातील एकूण भात लागवडीपैकी जवळ - जवळ 35 टक्के क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात आहे तसेच एकूण तृणधान्य उत्पादनापैकी 35 टक्के उत्पादन हे महाराष्ट्र राज्याचे आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी - बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो.

मुसळधार पावसानंतर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली की आद्रतेचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत भात पिकावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जुलै ते डिसेंबर हा किडींचा प्रादुर्भाव कालावधी असतो. विशेषकरून ज्या रोपवाटिका वरकस जमिनीत केलेल्या आहेत तसेच हलक्या जातीची लागवड ज्या ठिकाणी केलेली आहे, त्या ठिकाणी किडींचा व रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो. चला तर मग जाणून घेऊया भात पिकातील खोड किडा, जिवाणूजन्य करपा आणि मुळ कुज रोगापासून संरक्षण कसे करावे याविषयीची माहिती.

खोड किडा (Stem borer):

  • या किडीचा पतंग 1 ते 2 सेमी लांब असतो, समोरील पंख पिवळे व मागील पांढरे असे असतात.
  • मादी पतंगाच्या पंखाच्या खालील भागावर काळसर ठिपका असतो; तर नर पतंगाच्या पंखावर काळसर ठिपका नसतो.

लक्षणे (Symptoms):

  • सुरवातीच्या काळात अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करून नंतर खोडात प्रवेश करते.
  • आतील भाग पोखरून खाते. परिणामी, फुटवा सुटण्यास सुरुवात होते यावेळी रोपाचा गाभा मरतो.
  • यालाच ‘डेट हार्ट’ किंवा ‘कीडग्रस्त फुटवा’ असे म्हणतात.
  • या रोपांचा फुटवा ओढल्यास सहजासहजी निघून येतो.
  • पीक तयार होण्याच्या वेळी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात.
  • या लोंब्यांना कोकणात ‘पळिंज’ तर विदर्भामध्ये ‘पांढरी पिशी’ असे म्हणतात.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • रोवणीपूर्वी रोपांचे शेंडे तोडून बांबूच्या टोपलीत जमा करावीत. ती टोपली खांबावर टांगावी, त्यामुळे रोपाच्या शेंड्यावर असणारी खोडकिड्याची अंडी नष्ट होण्यास मदत होते.
  • रोपांची मुळे रोवणीपूर्वी क्‍लोरपायरीफॉस 20% ईसी (टाटा रॅलीस - तफाबान) 1 मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे द्रावणात 12 तास बुडवून ठेवावेत. नंतर रोवणी किंवा लागवड करावी.
  • पिकाची वरचेवर पाहणी करून कीडग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत. हे काम हंगामातून तीन ते चार वेळा करावे.
  • शेतात पक्षी थांबे लावावे.
  • शक्‍य असल्यास शेतामध्ये एकरी ट्रायकोग्राम चीलोनीस या परोपजीवी किटकाचा 50,000 अंडीपुंज म्हणजेच 4 ट्रायको कार्डचा वापर करावा.
  • दाट लागवड करु नये व पाण्याचा योग्य निचरा करावा.
  • फिप्रोनिल 0.6% जीआर (देहात - स्लेमाईट अल्ट्रा) + फिप्रोनिल 0.6% जीआर (देहात - स्लेमाईट) 4 किलोचा बेसल डोस द्यावा किंवा
  • क्लोरैंट्रानिलिप्रोल 18.5% एससीची (देहात - Ataque) 60 मिलीचा बेसल डोस द्यावा.
  • क्लोरोपायरिफॉस 50%+ सायपरमेथ्रिन 5% ईसी (देहात - CSquare) 2 मिलि प्रति लीटर पाणी किंवा
  • कार्टॅप हायड्रोक्लोराइड 50% एसपी (धानुका - काल्डन 50) 2 ग्रॅम  प्रति लीटर पाणी किंवा
  • बायफेनथ्रिन 10% ईसी (देहात - Hurl) 1 मिलि प्रति लीटर पाणी किंवा
  • क्लोरैंट्रानिलिप्रोल 18.5% एससीची (देहात - Ataque) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% डबल्यु/डबल्यु (FMC-कोरेजन) 0.4 मिली प्रति लीटर पाणी किंवा
  • क्लोरैंट्रानिलिप्रोल 10% +लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% झेडसी (सिजेंटा - Ampligo) 0.4 मिली प्रति लीटर पाणी फवारावे.

जिवाणूजन्य करपा (Bacterial blight):

हा एक अणूजीवोद्भवी रोग आहे.

लक्षणे (Symptoms):

  • रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळसर पांढरे अर्थ पारदर्शक ठिपके पडतात. ठिपक्यांची सुरुवात पानाच्या टोकाकडून देठाकडे आणि एक किंवा दोन्ही कडांकडून आत अशी होते.
  • रोगाची पूर्ण वाढ झाल्यावर संपूर्ण पान करपते आणि त्याचा रंग राखाडी किंवा तांबुस तपकिरी होतो.
  • हवामान अनुकूल असल्यास रोगाचे जिवाणू पानाच्या शिरात शिरतात. त्यामुळे चुडांची संपूर्ण पाने करपतात. भात पिक जागच्या जागी बसते. अशा अवस्थेस क्रेसेक असे म्हणतात.
  • रोगाचा प्रसार रोगग्रस्त पेंढा, शेतातील धसकटे किंवा खोडवा, रोगग्रस्त बियाणे आणि बांधावरील इतर तण यामुळे होतो.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • निरोगी बियाणे वापरावे किंवा रोगप्रतिबंधक जातीचा वापर करा.
  • या रोगाच्या नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • बियाण्यास पेरणीपूर्वी उष्णजल प्रक्रिया करावी त्यासाठी बियाणे 52 ते 54 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 10 मिनीटे बुडवावे.
  • स्ट्रेप्टोसाइक्लीन 6 ग्रॅम 120 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.
  • खतांचा संतुलित वापर करावा अतिरिक्त खतांचा वापर टाळावा शिफारशीनुसारच खताचे नियोजन करावे.
  • रोगबाधीत झाडे जाळून किंवा खोल नांगरट करुन नष्ट करावीत.

मूळ कूज (Root Rot):

मूळ कूज हा रोग विविध माती - जनित रोगजनकांमुळे होतो तो भाताच्या मुळांना संक्रमित करतो, ज्यामुळे वाढ खुंटते, आणि रोपांचा मृत्यू होतो.

लक्षणे (Symptoms):

  • पाने व खोड करड्या रंगाचे होते आणि रोगग्रस्त पीक नष्ट होते.
  • संक्रमित रोपांची मुळे ठिसूळ आणि कोरडी होतात.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करा. प्रतिरोधक वाणांची लागवड करा.
  • जास्त तापमानातील रोपे लागवडीसाठी टाळा.
  • कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) - 2.5 ग्रॅम ने प्रति किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
  • कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) - 400 ग्रॅम किंवा
  • मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी + मेटलैक्सिल 8% (टाटा - रॅलीस मास्टर) - 500 ग्रॅमने ड्रेंचिंग करावे.

तुम्ही तुमच्या भात पिकातील खोड किडा, जिवाणूजन्य करपा आणि मुळ कुज या किडी व रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

  1. महाराष्ट्रात भात पीक कुठे घेतले जाते?

महाराष्ट्रात भात पीक कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नाशिक, विभागाच्या सह्याद्री लगतच्या भागात घेतले जाते.

  1. भारतात, भाताची लागवड कोणत्या भागांमध्ये केली जाते?

भारतात, भाताची लागवड साधारणपणे सहा वेगवेगळ्या भागां मध्ये केली जाते, ज्यात किनारपट्टीचा सखल प्रदेश, खोल पाण्याचे क्षेत्र, पावसावर आधारित सखल प्रदेश, पावसावर आधारित उंच प्रदेश, बागायती खरीप आणि बागायती रब्बी या भागांमध्ये केली जाते.

  1. भात पिकात आभासमय काजळी रोगाची लक्षणे केव्हा दिसतात?

भात फुलोऱ्यात आल्यानंतर भात पिकात आभासमय काजळी रोगाची लक्षणे दिसतात.

32 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor