राजमा पिकाच्या लागवडीविषयीची माहिती (Information about cultivation of Kidney Bean (Rajma) crop)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
राजमा हे कडधान्न्यामध्ये मोडणारे पीक आहे. राजम्याला श्रावण घेवडा देखील म्हंटले जाते. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी राजमा हे कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारे पिक आहे. पोषणतत्व तसेच कॅल्शिअमने देखील हे भरपूर आहे व आपल्या शरीराला फिट ठेवण्याचे काम देखील राजमा करते. हे पीक भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यात जास्त घेतले जाते. महाराष्ट्रात मागच्या 30 वर्षांपासून सातारा जिल्ह्यापासून ह्या पिकाची सुरुवात झाली असून हे पीक उस्मानाबाद मधील कळंब तालुक्यामध्ये 10 हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये लागवड होत आहे. खूप चांगले उत्पन्न त्या भागातील शेतकरी घेत आहेत. आजच्या या भागात आपण याच पिकाच्या लागवडीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
राजमा लागवडीसाठी योग्य हंगाम (Suitable season for Rajma cultivation):
- राजमा हे पीक आपण तिन्ही हंगामामध्ये घेऊ शकतो तसेच हे पीक सद्या महाराष्ट्रात खूप वेगाने वाढत आहे.
- खरीप हंगामासाठी जून, जूलै महिन्यात रब्बी हंगामासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्यात राजम्याची लागवड करावी.
राजमा लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Land for Rajma Cultivation):
- मध्यम ते भारी व उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत राजमा पीक चांगले वाढते.
- आम्लधर्मी किंवा चोपण जमिनीत हे पीक घेणे टाळावे.
- जमिनीचा सामु 5.5 ते 6 च्या दरम्यान असावा.
राजमा लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Climate for Rajma Cultivation):
- थंड, समशीतोष्ण हवामान या पिकास मानवते.
- 70 - 80 सें.मी पर्यंत पाऊसमान असलेल्या भागात हे पीक चांगले येते.
- पिकाच्या वाढीस 16 - 24 डी. सें.ग्रे. तापमान लागते.
- हे पीक धुके, जास्त पाऊस, जास्त काळ हवामानातील आर्द्रता यास संवेदनशील आहे.
पूर्व मशागत:
पिकाच्या लागवडीसाठी खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर मध्यम खोल नांगराने नांगरट करून ढेकळे फुटल्यानंतर हेक्टरी 20-25 बैलगाड्या शेणखत घालून वखराच्या आडव्या उभ्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
वाण (Rajma Varieties):
- कंटेडर
- पुसा पार्वती
- अर्का कोमल
- वाघ्या
- फुले सुरेखा
बीजप्रक्रिया:
जर्मिनेटर 25 मिली + प्रोटेक्टंट 10 ग्रॅम प्रति लि. पाण्यात घेऊन बियाणे 5 ते 10 मिनिटे भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरणी करावी. म्हणजे बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टळून उगवण लवकर व अधिक प्रमाणात होईल.
लागवड पद्धती:
पाभर किंवा तिफणीने पेरणी:
खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्यावर, जमिन वाफश्यावर आल्यावर करावी. या पद्धतीने केल्यास दोन ओळीत 45 सेमी अंतर ठेवतात. अशा वेळी एकरी 15 किलो बियाणे लागते. हलक्या जमिनीत दोन ओळीत 30 सेमी अंतर तर दोन झाडात 10 सेमी अंतर ठेवतात.
टोकण पद्धत:
उन्हाळी हंगामात बियांची पेरणी टोकण पद्धतीने केल्यास 30 सेमी वर बिया टोचतात. या पद्धतीत एकरी 10 किलो बियाणे लागते. टोकण पद्धतीमध्ये 2/3 सेमी खोलवर बिया टोचाव्या लागतात. सुमारे 45 ते 60 दिवसांनी शेंगा तोडणीस येतात. एकूण 4/5 तोडे होतात, तर एकरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन निघते.
खत व पाणी व्यवस्थापन (Fertilizer and Water Management):
- राजमा पिक जमिनीत असणारे स्फुरद, पालाश, नत्र अशी मुख्य अन्नद्रवे शोषून घेतात.
- राजमा पिकास प्रति एकरी 16 टन शेणखत, 20 ते 44 किलो पालाश, 20 ते 21.6 किलो नत्र, 20 ते 40 किलो स्फुरद द्यावे लागते.
- राजमा पिकाला फुले येण्याआधी पाणी दिले पाहिजे.
- पावसाळ्यात जमिनीतील पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घेतली पाहिजे.
- खरीप हंगामात पिकास पाणी देण्याची गरज भासत नाही परंतु पाऊस नसल्यास गरजेनुसार पाणी दिले गेले पाहिजे.
- उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी दिले पाहिजे.
आंतरमशागत:
- खरीप हंगामात पिकाची पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी विरळणी करावी.
- खरीप हंगामात तणांचा योग्य वेळी बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
- 1 ते 2 खुरपण्या देऊन तण काढावे किंवा पेरणीपूर्वी तणनाशकाची फवारणी करावी.
- खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आणि योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
हंगामाच्या अखेरीस वाळलेल्या शेंगा काढून, मोगरीने झोडल्यास दाणे निघतात. एकरी ५ / ७ क्विंटल दाण्यांचे उत्पादन होते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार राजमा लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या राजमा पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. राजमा पिकाची लागवड कधी करावी?
राजमा पिकाची लागवड खरीप हंगामासाठी जून, जूलै महिन्यात रब्बी हंगामासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्यात करावी.
2. राजमा पिकास कोणते हवामान मानवते?
थंड, समशीतोष्ण हवामान राजमा पिकास मानवते.
3. राजमा पिकास कोणती जमीन मानवते?
राजमा पिकास मध्यम ते भारी व उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत पीक चांगले वाढते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor